मुंबई, 30 डिसेंबर: सध्या सुरू असणाऱ्या वेडिंग सीझनमध्ये जर तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर सध्या तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण सध्या सोन्यासह चांदीचे दर देखील (Gold and Silver Rates Today) कमी झाले आहेत. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर (Gold Rates Today on MCX) 0.18 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर सोन्यासह चांदी देखील उतरली आहे.
किती स्वस्त झालं आहे सोनं आणि चांदी?
आज एमसीएक्सवर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा दर 0.18 टक्क्यांनी कमी झाला आहे. यानंतर सोन्याचा भाव 47,751 रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. आज चांदीचा दर 0.41 टक्क्यांनी उतरली आहे, यानंतर चांदीचा भाव 61,581 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
घरबसल्या जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर
शहर | आजचा दर (प्रति तोळा) | कालचा दर (प्रति तोळा) |
मुंबई | 49000 रुपये | 49010 रुपये |
पुणे | 48,870 रुपये | 48,880 रुपये |
नाशिक | 48,870 रुपये | 48,880 रुपये |
नागपूर | 49000 रुपये | 49010 रुपये |
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
शहर | आजचा दर (प्रति तोळा) | कालचा दर (प्रति तोळा) |
मुंबई | 47000 रुपये | 47010 रुपये |
पुणे | 46,350 रुपये | 46,360 रुपये |
नाशिक | 46,350 रुपये | 46,360 रुपये |
नागपूर | 47000 रुपये | 47010 रुपये |
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर
शहर | आजचा दर (प्रति किलो) | कालचा दर (प्रति किलो) |
मुंबई | 61600 रुपये | 62500 रुपये |
पुणे | 61600 रुपये | 62500 रुपये |
नाशिक | 61600 रुपये | 62500 रुपये |
नागपूर | 61600 रुपये | 62500 रुपये |
हे वाचा-Income Tax विभागाचा करदात्यांना दिलासा, फेब्रुवारी 2022 पर्यंत करता येईल हे काम
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.