नवी दिल्ली, 11 डिसेंबर: तुम्ही नोकरदार वर्गापैकी असाल आणि तुमच्याकडे भविष्य निर्वाह निधी (EPFO Alert) म्हणजेच पीएफ खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO ने सर्व पीएफ खातेधारकांना नॉमिनी जोडणे अनिवार्य केले आहे. हे काम तुम्हाला या महिनाअखेर करता येणार आहे. EPFO ने नॉमिनी जोडण्याचं काम पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 ही डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत तुमच्या पीएफ खात्यात नॉमिनी जोडला नाही तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. EPFO ची ही प्रक्रिया पीएफ खातेधारकांवर अवलंबून असणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आहे. पीएफ खातेधारकांसह काही अनुचित प्रकार घडल्यास, नामांकित व्यक्तीला विमा आणि पेन्शन यासारखे फायदे मिळतात. अलीकडेच EPFO ने म्हटले होते की, ‘EPFO सदस्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी ई-नॉमिनेशनच्या सुविधेचा लाभ घ्यावा. भविष्य निर्वाह निधी, पेन्शन आणि विमा सेवांचा ऑनलाइन लाभ घेण्यासाठी तुमचे ई-नामांकन दाखल करा. तुमची पत्नी, मुले आणि पालकांची काळजी घेण्यासाठी आणि ऑनलाइन पीएफ, पेन्शन आणि विम्याद्वारे त्यांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहकाने नॉमिनेशन दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’ हे वाचा- 900 जणांना व्हिडीओ कॉलवरुन सेवेतून काढणाऱ्या CEO ना झटका! कंपनीने पाठवलं रजेवर ऑनलाइन करू शकता हे काम पीएफ अकाउंट होल्डर्स नॉमिनीनेशनची प्रक्रिया ऑनलाइन देखील पूर्ण करू शकता. ईपीएफओ ही सुविधा देत आहे की अकाउंट होल्डर्स एकापेक्षा जास्त नॉमिनीची सुविधा देत आहेत. याशिवाय पीएफ अकाउंट होल्डर्स नॉमिनीला मिळणारी भागीदारी देखील निश्चित करू शकता. ई-नॉमिनेशनची काय आहे प्रक्रिया » सर्वप्रथम ईपीएफओची अधिकृत वेबसाइट ओपन करा » आता तुम्हाला UAN आणि पासवर्डद्वारे लॉग इन करावे लागेल. » मॅनेज सेक्शनमध्ये जाऊन ई-नामांकन लिंकवर क्लिक करा. हे वाचा- मुंबईच्या रस्त्यावर बॅग विकणाऱ्या व्यक्तीने कशी उभारली 250 कोटींची कंपनी! » आता नॉमिनीचे नाव आणि इतर तपशील भरा. » एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडण्यासाठी Add New बटणावर क्लिक करा. » यानंतर Save Family Details वर क्लिक करताच ही प्रक्रिया पूर्ण होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.