नवी दिल्ली, 11 डिसेंबर: Better.com चे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (Better.com CEO Vishal Garg) विशाल गर्ग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. शुक्रवारी एका इमेलबाबत नमुद करत Vice ने माहिती दिली. या अहवालानुसार चीफ फायनान्शिअल ऑफिसर केव्हिन रेयान (CFO Kevin Ryan)आता कंपनीची दररोजचे निर्णय घेतील आणि बोर्डाकडे रिपोर्ट करतील. कंपनीच्या बोर्डाने लीडरशिप आणि कल्चरल असेसमेंटसाठी थर्ड पार्टी इंडिपेंडंट फर्मची नियुक्ती केली आहे. Reuters ने याबाबत बेटर.कॉमकडे प्रतिक्रिया विचारली असता कोणंतही उत्तर समोर आलेलं नाही.
याआधी विशाल गर्ग यांनी झूम कॉलच्या माध्यमातून 900 लोकांना कामावरुन काढल्यामुळे माफी मागितली होती. त्यांच्या या वागण्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून माफी मागितली. या पत्रात त्यांनी त्यांची चूक मान्य केली होती. तसेच हे देखील म्हटलं होतं की त्यांची पद्धत चुकीची होती.
हे वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे सामान्यांना फटका, 1 लीटरसाठी इतकी मोजावी लागेल किंमत
900 कर्मचाऱ्यांना Zoom मीटिंगवर कामावरुन काढलं
बेटर डॉट कॉम (Better.com) या कंपनीनं आपल्या 900 पेक्षा अधिक कर्मचार्यांना मोठा धक्का दिला होता. वार्षिक सुट्ट्यांच्या अगोदर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गर्ग यांनी काही कर्मचाऱ्यांची झूम मिटींग घेतली. त्यांनी 1 डिसेंबर 2021 रोजी कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. 'आत्ता यावेळी झूम कॉलवर उपस्थित असलेले लोक दुर्दैवी आहेत. त्यांना तत्काळ नोकरीवरून काढून टाकलं जात आहे. नोकरी गेल्यानंतर तुम्हाला कुठले आर्थिक लाभ मिळतील याबाबत लवकरच एचआरकडून ईमेल मिळेल', अशा शब्दांत गर्ग यांनी कर्मचाऱ्यांना नोकरी गेल्याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेणं कठीण जात आहे. मात्र, लॉकडाऊनच्या संकटामुळं मी देखील हतबल आहे, असंही गर्ग म्हणाले.
हे वाचा-जर तुम्ही भाडेकरू असाल तर जाणून घ्या हे कायदेशीर नियम, ठरतील फायदेशीर!
का गेली इतक्या लोकांची नोकरी?
कंपनीनं कर्मचाऱ्यांवर अनप्रॉडक्टीव्ह असल्याचा ठपका ठेवला आहे. बॅलन्स शीट ठीक करणं आणि फोकस्ड वर्कफोर्स तयार करण्याची कारणं देऊन कंपनीनं ही कर्मचारी कपात केली आहे. ज्यांनी कुणी झूम कॉलच्या माध्यमातून 900 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा व्हिडीओ पाहिला ते विशाल गर्ग यांना खडूस बॉस म्हणत होते.
कोण आहे विशाल गर्ग?
विशाल गर्ग (All about better dot com ceo vishal garg) हे Better.com चे संस्थापक आणि CEO आहेत, जे घरमालकांना गृहकर्जासह विविध सेवा पुरवतात. लिंक्डइनवर उपलब्ध माहितीनुसार, ते वन झिरो कॅपिटल या गुंतवणूक होल्डिंग कंपनीचे संस्थापक भागीदार देखील आहेत. 43 वर्षीय विशाल गर्ग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. ते त्यांची पत्नी आणि तीन मुलांसह न्यूयॉर्कमधील ट्रेबेका याठिकाणी राहतात. ट्रेबेका हे न्यूयॉर्क शहरातील सर्वात महागडे ठिकाण आहे, ज्याठिकाणी श्रीमंत लोकं राहतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news