मुंबई, 10 डिसेंबर : तुषार जैन (Tushar Jain) हे हाय स्पिरिट कमर्शियल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (high spirit commercial ventures) नावाच्या कंपनीचे सह-संस्थापक आणि एमडी आहेत. पण, इथपर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना तुषार यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण त्यांनी हिंमत कधीच हारली नाही. यामुळेच आज ते अडीचशे कंपनीचे मालक आणि हजारो लोकांचे मालक म्हणून ओळखले जातात. पण, कधीकाळी ते मुंबईच्या रस्त्यावर बॅग विकायचे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का?
1992 मध्ये स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता (Harshad Mehta) घोटाळ्यात अनेकांना पैसे गमवावे लागले. झारखंडमधील व्यापारी मूळचंद जैन यांचंही नाव पैशा गमावणाऱ्यांमध्ये होतं. पैसे गमावल्यानंतर मूलचंद आणि त्याचा मुलगा तुषार जैन यांना मुंबईच्या रस्त्यावर पिशव्या विकण्यास भाग पडले.
अशा परिस्थितीतही तुषार जैन यांनी हार मानली नाही. सर्वस्व झोकून मेहनतीने काम करत राहिले. खूप संघर्षानंतर, तुषार यांनी 2012 मध्ये हाय स्पिरिट कमर्शियल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. आज तुषार यांची कंपनी देशातील चौथी मोठी बॅग बनवणारी कंपनी आहे. या 250 कोटींच्या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. यासोबतच कंपनीची देशभरात 10 कार्यालये आहेत, जी देशातील विविध राज्यांमध्ये आपले पाय रोवत आहेत.
सामान्यांना मोठी बातमी! वाढत्या महागाईत आणखी एक झटका,हॉस्पिटलमध्ये उपचार महागणार
हळूहळू कंपनीचा व्यवसाय वाढला
2014 मध्ये तुषार यांची कंपनी दिवसाला 10,000 ते 20,000 बॅगींचं उत्पादन करत होती. तेव्हा कंपनीची उलाढाल 90 कोटी होती. अवघ्या 3 वर्षात त्यांच्या कंपनीची उलाढाल दुपटीने वाढली आहे. 2017 मध्ये, कंपनीने 250 चा टप्पा गाठला आणि दररोज पिशव्या बनवण्याची क्षमता 30,000 वरून 35,000 पर्यंत वाढली. 1999 मध्ये तुषार जैन यांनी 300 किरकोळ विक्रेत्यांसह व्यवसाय सुरू केला होता.
2002 मध्ये आपला व्यवसाय देशभर पसरवण्याच्या विचारात ते मुंबईत आले. 2006 मध्ये तुषार यांनी प्रायोरिटी नावाचा पहिला ब्रँड सुरू केला. 2007 पर्यंत त्यांना भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी जागा मिळाली होती. आजकाल तुषार यांची कंपनी एका दिवसात तीन ते चारशे बॅग तयार करतात. सततच्या यशानंतर तुषार यांनी 2017 मध्ये ट्रॅवर्ल्ड आणि हॅशटॅग लाँच केले.
Elon Musk यांनी टेस्लाचे 96.32 कोटी डॉलर्सचे शेअर्स विकले,आता शेअर खरेदीची तयारी
तुषार यांनी बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरला त्याच्या ब्रँड ट्रायबेगची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून साइन केल. तुषार यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, पुढील 5 वर्षात त्याच्या कंपनीने 1000 कोटींची उलाढाल करण्याचे त्यांचं स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी तुषार बिहारमधील पाटणा येथे नवीन प्लांट उभारत आहे. जिथे तो वर्षाला 25 लाख बॅग तयार करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.