Home /News /money /

पोस्टाच्या या योजनेत पती-पत्नीने खाते उघडल्यास मिळेल दुप्पट फायदा, मिळतील 59400 रुपये

पोस्टाच्या या योजनेत पती-पत्नीने खाते उघडल्यास मिळेल दुप्पट फायदा, मिळतील 59400 रुपये

2 हजारांच्या नोटींची छपाई बंद करण्याचा कुठलाही विचार नाही. सरकार RBIच्या शिफारशीनुसार त्याबाबत निर्णय घेते असं त्यांनी सांगितलं.

2 हजारांच्या नोटींची छपाई बंद करण्याचा कुठलाही विचार नाही. सरकार RBIच्या शिफारशीनुसार त्याबाबत निर्णय घेते असं त्यांनी सांगितलं.

जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या (Post Office) एका योजनेबद्दल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. पती-पत्नीला ही योजना दुप्पट फायदा देऊ शकते.

    नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : आजकाल लोकं नोकरीव्यतिरिक्त कमाईचे इतर साधन देखील शोधत असतात. कारण फक्त एका उत्पन्नाच्या साधनातून बचत करणे कठीण होऊन जाते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या (Post Office) एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. पती-पत्नीला ही योजना दुप्पट फायदा देऊ शकते. कारण या योजनेमध्ये जॉइंट अकाउंट काढण्याचा देखील पर्याय आहे. या योजनेचे नाव मंथली इनकम स्कीम (MIS) असून यामध्ये दर महिन्याला कमाईची संधी मिळते. जाणून घ्या पोस्ट ऑफिसची ही योजना काय आहे? एमआयएस योजनेत एकल किंवा संयुक्त (Single or Joint Account) दोन्हीही पद्धतीची खाती उघडता येतील. वैयक्तिक खाते उघडताना या योजनेत तुम्ही किमान 1,000 आणि जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये गुंतवू शकता. तथापि, संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक व्याज दर 6.6 टक्के मिळत आहे. योजनेंतर्गत तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजानुसार परताव्याची मोजणी केली जाते. वार्षिक 59400 रुपयांची होईल कमाई जर तुम्ही या योजनेमध्ये जाइंट अकाउंट काढले तर तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल. समजा एखाद्या पती-पत्नीने या योजनेतील जाइंट खात्यामध्ये 9 लाखाची गुंतवणूक केली आहे. 9 लाखाच्या जमा रकमेवर 6.6 टक्के व्याजदराने वार्षिक रिटर्न 59400 रुपयांचा असेल. म्हणजेच दरमहा तुम्हाला 4950 रुपये मिळतील. यामध्ये तुमची मुळ रक्कम सुरक्षित राहिल. हवे तर 5 वर्षानंतर तुम्ही आणखी 5-5 वर्षांसाठी गुंतवूकीचा कालावधी वाढवू शकता. योजनेचे फायदे? एमआयएसमधील चांगली गोष्ट अशी आहे की दोन किंवा तीन लोक एकत्रितपणे संयुक्त खाते उघडू शकतात. या खात्याच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सदस्यास समान दिले जाते. संयुक्त खाती कधीही सिंगल खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. एकल खाते देखील संयुक्त खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. खात्यात बदल करण्यासाठी सर्व खाते सदस्यांचा संयुक्त अर्ज द्यावा लागेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Post office

    पुढील बातम्या