मराठी बातम्या /बातम्या /मनी /

2.8 लाख लोकांना मिळेल रोजगार, ही परदेशी कंपनी भारतात लवकरच सुरू करणार युनिट

2.8 लाख लोकांना मिळेल रोजगार, ही परदेशी कंपनी भारतात लवकरच सुरू करणार युनिट

अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला (Tesla) चे पहिले मॅन्युफॅक्चरिंग युनिट कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये सुरू करणार आहे. याबाबत अधिक माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा  (BS Yediyurappa) यांनी दिली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: अमेरिकन कार निर्माता कंपनी टेस्ला (Tesla)  चे पहिले मॅन्युफॅक्चरिंग युनिट कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये सुरू करणार आहे. याबाबत अधिक माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा  (BS Yediyurappa) यांनी दिली आहे. येडियुरप्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तुरमूर जिल्ह्यामध्ये एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर देखील बनवण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 7725 कोटी रुपये खर्च होणार असून याअंतर्गत 2.8 लाख लोकांना रोजगार देखील मिळेल.

भारतात एंट्री करण्यासंदर्भात गेल्यावर्षी केली होती घोषणा

दिग्गज उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) यांनी यापूर्वी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. आता अखेर ही प्रतीक्षा संपली असून टेस्लाने त्यांची सब्सिडियरी कंपनी टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्राइव्हेट लिमिटेड (Tesla India Motors and Energy Private Limited) ची भारतामध्ये नोंदणी केली आहे. टेस्ला भारतात मॉडेल 3 सेडान कारसह भारतात एंट्री करण्यास सज्ज आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत 60 लाख असण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-SBIच्या या खास योजनेत करा गुंतवणूक; कधीही पैसे जमा करण्याची मुभा)

टेस्लाच्या भारतातीव आगमनाची माहिती सर्वप्रथम केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली होती.  डिसेंबरमध्ये गडकरी म्हणाले होते की, टेस्ला पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस भारतात आपले कामकाज सुरू करेल. ते म्हणाले होते की भारतामध्ये येत्या पाच वर्षांत जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहन उत्पादक होण्याची क्षमता आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार वायू प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करत असताना टेस्लाचा भारतातील प्रवेश मोठी बाब आहे.

(हे वाचा-ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात महत्त्वाची घडामोड, 21 वर्षीय तरुणीला अटक)

टेस्ला कंपनीनं त्यांचं ऑफिस सुरु करण्यासाठी बंगळुरुची (Bengaluru) निवड केली आहे. दरम्यान ही कंपनी महाराष्ट्रात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. याच मुद्द्यावरून विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनी महाराष्ट्रात येईल असा विश्वास व्यक्त केला होता. टेस्लाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट देखील केले होते.

First published:

Tags: Tesla, Tesla electric car