अॅमेझॉननं 16 नोव्हेंबर रोजी आपल्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्माचारी कपात करणार असल्याची घोषणा केली होती. या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जेसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 संपेपर्यंत अॅमेझॉन जागतिक स्तरावरील कर्मचारी कमी करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवणार आहे. अॅमेझॉननं या (जानेवारी) महिन्याच्या सुरुवातीला सुमारे 18 हजार कर्मचार्यांना नोकरीवरून काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘अनिश्चित आर्थिक परिस्थिती’च्या समस्येचा सामना करण्यासाठी कंपनी खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करत आहे. खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यासोबतच मालमत्ता विक्रीही सुरू केली आहे. अॅमेझॉननं आपली काही कार्यालयं विक्रीस काढली आहेत. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. नवा व्यवसाय सुरु करायचाय? ‘हे’ लायसन्स घेऊन सुरु करा तुमची कंपनी अॅमेझॉनचे प्रवक्ते स्टीव्ह केली एका निवेदनात म्हणाले, “आमचं नेटवर्क आमच्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करतं की नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही नेहमी त्याचं मूल्यांकन करत असतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही मेट्रो कॉर्पोरेट सेंटरची साइट विकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्थानिक समुदायाचा एक भाग बनून आनंदी आहोत. आम्ही मिलपिटासमधील आमच्या दोन डिलिव्हरी स्टेशन्समधून ग्राहकांना डिलिव्हरी सर्व्हिस देत राहू.” ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, अॅमेझॉन कॅलिफोर्नियातील रिकाम्या कार्यालयाची विक्री करणार आहे. या कार्यालयाची सुमारे 16 महिन्यांपूर्वी खरेदी झाली होती. काही रिअल इस्टेट लॉकडाउन करण्यासाठी ऑक्टोबर 2021 मध्ये 123 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च करून ही मालमत्ता खरेदी केली गेली होती. जेणेकरून ती भविष्यात वापरता येईल. कंपनीनं एका व्यावसायिक रिअल इस्टेट डेव्हलरपसोबत करार करण्याचा विचार केला आहे. सूत्रांनी ब्लूमबर्गला दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉनला या मालमत्ता विक्रीमध्ये तोटा होऊ शकतो. तर दुसऱ्या एका सूत्राच्या म्हणण्यानुसार, या मालमत्तेची अंतिम किंमत ठरवण्यासाठी अद्याप वाटाघाटी सुरू आहेत.
18 हजार कर्मचार्यांना काढून टाकण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून कंपनी लवकरच काही जणांना नोकरीतून कमी करण्याची नोटीस पाठवणार आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याबाबत रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीनं आपल्या दोन हजार 300 कर्मचार्यांना काढून टाकल्याची वॉर्निंग नोटीस पाठवली आहे. कर्मचारी कपातीच्या या नवीन फेरीचा परिणाम यूएस, कॅनडा आणि कोस्टा रिकामधील कर्मचाऱ्यांवर होत असल्याची नोंद आहे. कर्मचाऱ्यांना मेमो पाठवण्यात आला आहे. वॉशिंग्टन राज्याच्या ‘रोजगार सुरक्षा विभागा’त दाखल असलेल्या नोटीसनुसार, सिएटलमधील 1 हजार 852 आणि बेलेव्ह्यू व वॉशिंग्टनमधील 448 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जाईल. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, या वर्षी मार्चमध्ये प्रत्यक्ष कर्मचारी कपात सुरू होईल. 60 दिवसांचा ट्रान्झिशनल पिरियड असेल ज्या अंतर्गत प्रभावित कर्मचार्यांना पगार मिळेल. या प्रक्रियेचा कामावर परिणाम होणार नाही. आता क्रेडिट कार्डने भरु शकता घरभाडे, जाणून घ्या PhonePe च्या माध्यमातून रेंट पेमेंटची प्रोसेस
कशी आहे भारतातील परिस्थिती
कर्मचारी कपात सुरू झाल्यानंतर अॅमेझॉन इंडियातील एका कर्मचार्यानं कार्यालयातील अस्वस्थ वातावरणाची माहिती दिली आहे. भारतीय व्यावसायिकांसाठी असलेल्या ग्रेपवाइन या कम्युनिटी अॅपवर एका कर्मचाऱ्यानं ‘सुडो’ नावानं ही पोस्ट प्रकाशित केली होती. कर्मचाऱ्यानं लिहिलं, “माझ्या टीममधील सुमारे 75 टक्के लोक कमी झाले आहेत. मी उरलेल्या 25 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये असलो तरीही मला आता काम करण्याची इच्छा होत नाही. ते केबिनमधील (उच्च पदस्थ) लोकांना नोकरीवरून काढत आहेत. ऑफिसमध्ये अनेकजण रडत आहेत.”