नवी दिल्ली, 08 जानेवारी: भारत आणि चीन या शेजारी देशांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. सीमारेषेवर चीनकडून करण्यात येत असलेल्या घुसखोरीमुळे संपूर्ण देशात चीनबाबत असंतोष आहे. देशभरातील चिनी वस्तू, विविध चिनी कंपन्यांचे प्रोडक्ट्स न वापरण्याचा निर्णय भारतीयांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील 'आत्मनिर्भर भारत'ची (Atmanirbhar Bharat) ची घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात चिनी वस्तू न वापरण्यावर भारतीयांनी भर दिला आहे. मात्र अशावेळी व्हायरल होणारी एक बातमी भारतीयांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या बातमीत असा दावा केला जात आहे की, 2017 पासून 2019 पर्यंत भारतामध्ये चीनचा एफडीआय (FDI) 2.8 अब्ज डॉलरवरून वाढून 4.14 अब्ज डॉलर झाला आहे. सरकारने या बातमीतील दावा फेटाळला असून सदर बातमी चुकीची असल्याचे म्हटले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने ट्विटर अकाउंटवरून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
A claim is being made on social media that the Chinese FDI into India has increased from $2.8 bn in 2017 to $4.14 bn in 2019.#PIBFactCheck: This data is #Fake and #Incorrect. The FDI inflow from China has declined from $0.350 bn in 2017 to $0.163 bn in 2019. pic.twitter.com/I3WrjxBxmH
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 7, 2021
याबाबत स्पष्टीकरण देताना सरकारने असं म्हटलं आहे की, चीनची भारतातील थेट परदेशी गुंतवणूक अर्थात Foreign Direct Investment (FDI) 2017 मध्ये 0.350 अब्ज डॉलर होती, त्यामध्ये घट होऊन FDI 2019 मध्ये 0.163 अब्ज डॉलर झाला आहे. PIB फॅक्ट चेकने सोशल मीडियावर करण्यात आलेला दावा फेटाळला आहे.
पीआयबी फॅक्ट चेक काय काम करते?
PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता.
कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India china, Money, PIB