मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ICICI च्या माजी CEO चंदा कोचर यांच्या अडचणी वाढल्या, मनी लाँड्रिंग प्रकरणी ED ने दाखल केलं आरोपपत्र

ICICI च्या माजी CEO चंदा कोचर यांच्या अडचणी वाढल्या, मनी लाँड्रिंग प्रकरणी ED ने दाखल केलं आरोपपत्र

सक्तवसुली संचालनालयानं (ED) बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात  (Money Laundering Case) ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर  (Chanda Kochhar), त्यांचे पती आणि अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट: सक्तवसुली संचालनालयानं (ED) बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात  (Money Laundering Case) आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) माजी सीईओ चंदा कोचर (Chanda Kochhar), त्यांचे पती आणि अन्य आरोपींविरोधात आरोपांशी संबंधित मसुदा कागदपत्रे सादर केली. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांअतर्गत (PMLA) गठित करण्यात आलेल्या न्यायालयाने आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्यासाठी 6 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांचा समावेश आहे.

दीपक कोचर यांनाही झाली होती अटक

गेल्य वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेने दीपर कोचर यांना अटक केली होती. त्यांनतर ते तुरुंगातच होते. विशेष पीएमएलए न्यायालयाने चंदा कोचर आणि धूत यांना कोर्टात हजर राहिल्यांनतर जामीन दिला होता. कोचर यांना फेब्रुवारीत तर धूत यांना मार्चमध्ये जामीन मिळाला होता. याप्रकरणी या दोनही आरोपींना कधी अटक करण्यात आली नव्हती. तर दीपक कोचर यांना सप्टेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे संचालनालयाने कोचर, धूत आणि इतरांविरुद्ध मनी लाँडरिंगचा फौजदारी गुन्हा दाखल केला होता.

हे वाचा-Jio च्या या प्लॅनमध्ये मिळतोय 1000 GB पेक्षा जास्त डेटा! मिळेल फ्री कॉलिंगही

काय आहे प्रकरण?

ईडीचा असा आरोप आहे की, चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या समितीने व्हिडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 300 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आणि 8 सप्टेंबर 2009 रोजी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजने न्यूपॉवर रिन्यूएबल प्रायव्हेट लिमिटेड (एनआरपीएल) ला 64 कोटी रुपये दिले. एनआरपीएल ही कंपनी दीपक कोचर यांच्या मालकीची आहे.

हे वाचा-Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, काय आहे आजचा एक लीटरचा भाव

या प्रकरणातील सुनावणीत अशी माहिती समोर आली होती की, पीएमएलए अंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या साहित्याचा तपशील, लेखी तक्रार आणि नोंदवलेल्या निवेदनात असे दिसून येते की चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आरोपी धूत आणि व्हिडिओकॉन ग्रुपच्या कंपन्यांना कर्ज दिलं होतं.

First published:

Tags: Chanda kochhar, Financial fraud, Icici bank, Money fraud, Online fraud