नवी दिल्ली, 10 जानेवारी : ICICI च्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दणका बसलाय. ED ने चंदा कोचर यांचा मुंबईतला फ्लॅट आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची संपत्ती जप्त केली आहे. या सगळ्याची एकूण किंमत 78 कोटी रुपये सांगितली जातेय. 2012 मध्ये ICICI ने व्हिडिओकॉनला दिलेल्या 3 हजार 250 कोटींच्या कर्जाचं हे प्रकरण आहे. काय आहे प्रकरण? चंदा कोचर यांच्यावर आपल्या पतीला फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्टनुसार ICICI ने व्हिडिओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. व्हिडिओकॉन ग्रुपने या कर्जाच्या 86 टक्के रक्कम चुकवली नव्हती. 2017 मध्ये हे कर्ज NPA मध्ये टाकण्यात आलं. व्हिडिओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांनी 2010 मध्ये न्य पॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेडला (NRPL) 64 कोटी रुपये दिले होते. (हेही वाचा : KYC करण्यासाठी आता जावं लागणार नाही बँकेत, RBI ने बदलला सगळ्यात मोठा नियम) ही कंपनी वेणूगोपाल धूत यांनी दीपक कोचर आणि आणखी दोन नातेवाईकांसोबत उभारली होती. कोण आहेत चंदा कोचर? चंदा कोचर यांनी भारतीय बँकिंग क्षेत्रातलं पुरुषांचं वर्चस्व मोडून काढून स्वत:ची ओळख बनवली. जगभरातल्या बँकिंग क्षेत्रात त्यांचं मोठं नाव झालं. एक मॅनेजमेंट ट्रेनी ते ICICI बँकेच्या सीईओ असा त्यांचा प्रवास आहे. फोर्ब्ज मॅगेझिनच्या जगातल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत चंदा कोचर यांचा समावेश होता. त्याच चंदा कोचर यांना या गैरव्यवहारामुळे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. (हेही वाचा : आता 5 दिवसांत सुरू करू शकता कोणताही बिझनेस, मोदी सरकार करणार हे बदल) ============================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







