Home /News /money /

भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे संकेत, शेअर बाजारात 54,980 कोटींची परदेशी गुंतवणूक

भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे संकेत, शेअर बाजारात 54,980 कोटींची परदेशी गुंतवणूक

कोरोनाची साथ (Corona Pandemic) आणि लॉकडाउन (Lockdown) यामुळे कमजोर पडलेली अर्थव्यवस्था (Economy) आता हळूहळू रुळावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

    नवी दिल्ली, 12 डिसेंबर: कोरोनाची साथ (Corona Pandemic)आणि लॉकडाउन (Lockdown) यामुळे कमजोर झालेली अर्थव्यवस्था (Economy) आता हळूहळू रुळावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतात परदेशी गुंतवणूकही वाढत आहे. 18 डिसेंबरपर्यंत भारतीय शेअर बाजारांमध्ये (Indian Share Markets) परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) तब्बल 54हजार 980 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. जागतिक बाजारांमध्ये (International Markets) रोखीचा ओघ वाढल्यानं आणि विविध केंद्रीय बँकांना भांडवलासाठी आणखी एक पॅकेज मिळण्याची शक्यता असल्यानं परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूकीला प्राधान्य दिलं आहे. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार 18 डिसेंबरपर्यंत शेअर्समध्ये 48 हजार 858 कोटींची तर बाँड्समध्ये 6 हजार 112 कोटींची अशी एकूण 54 हजार 858 कोटींची गुंतवणूक झाली असल्याची माहिती मिळते आहे. गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये 62 हजार 951 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाली होती. (हे वाचा-सलग पाचव्या दिवशी सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी, दर पुन्हा 50 हजारांपेक्षा जास्त) मॉर्निंग स्टार इंडियाचे (Morning Star India) सहायक संचालक आणि विश्लेषक हिमांशू श्रीवास्तव म्हणाले, ‘जागतिक बाजारांमध्ये अतिरिक्त रोख भांडवल आणि कमी व्याजदर यामुळे भारतासारख्या देशांमध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. तसेच विविध देशातील केंद्रीय बँकाच्या वृद्धीसाठी प्रोत्साहन पॅकेजची अपेक्षा असल्यामुळेही गुंतवणूकदार जोखीम उचलत आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) येण्यानंही शेअर बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे, यामुळेही गुंतवणूक वाढत आहे.’ (हे वाचा-ख्रिसमसलाच या कंपनीच्या 1800 कर्मचाऱ्यांना झटका,बंद होणार महाराष्ट्रातील प्लँट) गेले काही दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजीचा कल कायम असून, दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवीन उच्चांकही नोंदवले आहेत. कोरोनाशी लढा देण्यातही भारत यशस्वी ठरत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढवणं आणि मृत्यू दर जगात सर्वांत कमी राखण्यात भारतानं यश मिळवलं आहे. कोरोनावरील लशी उत्पादनातही भारत आघाडीवर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योग क्षेत्रालाही चालना मिळाली आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. एफपीआय (FPI) म्हणजे परदेशी गुंतवणूक म्हणजे काय ? - परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक म्हणजे परदेशातील बाँड्स (Bonds), शेअर्स (Shares) यात गुंतवणूक केली जाते. - यामध्ये अन्य देशातील नागरिकांद्वारे शेअर्स, सरकारी रोखे, व्यावसायिक रोखे आणि अन्य गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवले जातात. - ही गुंतवणूक अल्पकालीन आर्थिक लाभ मिळवण्याच्या दृष्टीनं केली जाते. यात व्यावसयिक नियंत्रण मिळवण्याचा उद्देश नसतो. - ही गुंतवणूक शेअर बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन केली जाते. - सर्वसामान्य गुंतवणूकदार ही गुंतवणूक करतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Economy, Money

    पुढील बातम्या