नवी दिल्ली, 22 डिसेंबर: आज सलग पाचव्या दिवशी भारतीय रिटेल मार्केटमध्ये सोन्याचांदीच्या स्पॉट किंमतीमध्ये (Spot Price of Gold and Silver) तेजी पाहायला मिळाली. सोमवारी दिल्लीमध्ये सोन्याचे दर 496 रुपये प्रति तोळाने वाढून 50,297 रुपये प्रति तोळा झाले होते. तर मुंबईती रिटेल मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती (Gold Price) प्रति तोळा 200 रुपयांनी वाढून 50,308 रुपये प्रति तोळा झाली आहे. चांदीच्या दरात (Silver Price) देखील सोमवारी मोठी वाढ झाली, चांदीचे दर दिल्लीमध्ये 2,249 रुपयांनी वाढून 69,477 रुपये प्रति किलो झाली. तर मुंबईमध्ये 673 रुपये प्रति किलोने चांदीचे दर वाढले आहेत. या वाढीनंतर चांदी 67,192 रुपये किलोवर पोहोचली आहे.
याआधीच्या सत्रात सोन्याचे दर राजधानी दिल्लीमध्ये 49,801 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते, तर चांदीचे दर 67,228 रुपये प्रति किलोग्रॅम वर बंद झाले होते. HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल (Tapan Patel) यांच्या मते यूरोपमध्ये कोरोना व्हायरचे वाढते संक्रमण, ब्रिटनमध्ये कोव्हिडच्या नवीन स्ट्रेनबाबत समोर आलेली माहिती आणि त्यानंतर अनेक देशांनी प्रवासावर लावलेले निर्बंध यामुळे सोन्याचांदीच्या किंमतीना सपोर्ट मिळाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य घसरल्याने देखील सोन्याचांदीचे दर वाढले आहेत.
(हे वाचा-9 दिवसांमध्ये ITR नाही फाइल केला तर 10000 रुपये दंड, वाचा सविस्तर)
Gold Futures च्या किंमतीतही वाढ
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज वायदे सोन्याची (Gold Futures) किंमतीतही तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र चांदीच्या वायदे किंमतीत (Silver Futures) किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे.
(हे वाचा-1 जानेवारीपासून बदलणार हे 10 महत्त्वाचे नियम, तुमच्या जीवनावर होणार थेट परिणाम)
MCX वर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या सोन्याच्या वायदे किंमतीत 0.23% अर्थात 115 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. यानंतर दर 50,419 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर 5 मार्च 2021 च्या डिलिव्हरीच्या चांदीमध्ये 0.35% अर्थात 235 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दर प्रति किलो 67.672 रुपये प्रति किलोवर पोहोले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,898 डॉलर प्रति औंस आणि चांदी 26.63 डॉलर प्रति औंस वर पोहोचले होते.