नवी दिल्ली, 28 जानेवारी: जर तुमचे फेब्रुवारी महिन्यामध्ये बँकेशी संबंधित एखादे काम असेल, तर त्याकरता महिन्यातील सुट्ट्या तपासूनच कामाची आखणी करा. बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holiday) यादी तपासूनच बँकेत जा, अन्यथा तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. फेब्रुवारीमध्ये एकूण 8 दिवस बँका बंद राहणार आहेत. फेब्रुवारीमध्ये देखील बँकांच्या सुट्ट्या विविध राज्यांच्या सणांवर आधारित आहेत. आरबीआय (RBI Reserve Bank of india) ने वर्षभराचे बँक हॉलीडे जाहीर केले आहेत. केंद्रीय बँकेकडून बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 2021 मध्ये 56 दिवस बँका बंद राहणार आहेत.
फेब्रुवारीमध्ये किती दिवस बंद राहणार बँका (Bank Holiday List in February 2021)
-12 फेब्रुवारी 2021: शुक्रवार- सोनम लोसार- सिक्किम
-13 फेब्रुवारी 2021: दुसरा शनिवार
-15 फेब्रुवारी 2021: सोमवार- लुई नगाई नी- मणिपूर
-16 फेब्रुवारी 2021: मंगळवार- वसंत पंचमी- हरियाणा, ओडिसा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल
(हे वाचा-21 हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी खूशखबर! 1 एप्रिलपासून मिळणार या सुविधा)
-19 फेब्रुवारी 2021: शुक्रवार- छत्रपति शिवाजी महाराज जयंती- महाराष्ट्र
-20 फेब्रुवारी 2021: शनिवार- अरुणाचल आणि मिजोरम स्टेट डे- अरुणांचल और मिजोरम
-26 फेब्रुवारी 2021: शुक्रवार- हजरत अली जयंती- उत्तर प्रदेश
-27 फेब्रुवारी 2021: चौथा शनिवार, गुरु रविदास जयंती- चंडीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाब
कॅलेंडरपाहून आखा योजना
आरबीआयने अगदी शेवटच्या क्षणी होणाऱ्या खोळंब्यापासून वाचण्यासाठी सुट्ट्यांचे कॅलेंडर पाहून बँकेत जाण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय बँकांनी अशी माहिती दिली आहे की, जरी बँकांच्या शाखा बंद असल्या तरीही मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग या सेवा काही अपवाद वगळता 24 तास चालू राहतील. छोट्या-मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी तुम्ही ऑनलाइन बँकिंगचा वापर करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.