• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • US Election 2020 च्या निकालाच्या प्रतीक्षेदरम्यान घसरलं सोनं, वाचा काय आहेत आजचे दर

US Election 2020 च्या निकालाच्या प्रतीक्षेदरम्यान घसरलं सोनं, वाचा काय आहेत आजचे दर

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालावर (US Election Result 2020) जगभरातील अनेक गोष्टी अवलंबून आहेत. कमोडिटी मार्केट, शेअर बाजार अगदी सोन्याचे दर यावरही या चुरशीच्या लढतीचा परिणाम होत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालाकडे (US Election Result 2020) सर्वांचे डोळे लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि जो बायडन (Joe Biden) यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते आहे. एकाही उमेदवाराने अद्याप स्पष्ट आघाडी घेतली नाही आहे. याचा परिणाम कमोडिटी बाजारावर होत आहे. कमोडिटी बाजारात यामुळे तणावाची परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट प्राइज (Spot Gold) 0.5 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर COMEX वर अमेरिकन वायदे बाजारातील सोन्याची किंमत (US Gold Futures) 0.7 टक्क्यांची घट झाली आहे. सोन्याचे नवे दर (Gold Rates on 4th November 2020) अमेरिकेसह भारतात सणासुदीचा काळ असूनही देशांतर्गत बाजाराच स्पॉट गोल्डमध्ये घसरण पाहायला मिळाली. भारतात 99.9 टक्के शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 50 रुपये प्रति तोळाने कमी झाली आहे. आज सोन्याची किंमत 50,900 रुपये प्रति तोळा आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 50 हजारांच्या खाली आहे. या प्रतिच्या सोन्याचे दर 49,900 रुपये प्रति तोळा आहे. (हे वाचा-पेन्शनधारकांसाठी अलर्ट! 31 डिसेंबरपूर्वी हे काम न केल्यास थांबेल तुमचे पेन्शन) भारतात सर्वात स्वस्त 24 कॅरेट सोने पटना, पुणे आणि मुंबईमध्ये विकले जात आहे, ज्याठिकाणी भाव   50,900 रुपये प्रति तोळा आहे. तर दिल्ली, जयपूर आणि लखनऊमध्ये सोन्याचे दर सर्वात महाग आहेत. याठिकाणी किंमत 54,150 रुपये प्रति तोळा आहे. वायदे बाजारात मौल्यवान धातूंची किंमत घसरली भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Prices) आज उतरले आहेत. मल्टिपल कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या वायदा सोन्याची किंमत (Gold Futures Rate) घसरण झाली आहे. (हे वाचा-जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून करा ऑफिसचं काम, ही भारतीय कंपनी आखतेय योजना) दुपारी 1.45 मिनिटांनी या दरात 0.95 टक्के अर्थात 484 रुपये प्रति तोळाची घसरण होऊन तर 51,114 रुपयांवर ट्रेड करत होते. तर चांदीचे दर 2.66% अर्थात 1665 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. यानंतर चांदीचे भाव 61,020 रुपये प्रति किलोवर ट्रे़ड करत होते.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: