Home /News /money /

पेन्शनधारकांसाठी अलर्ट! 31 डिसेंबरपूर्वी हे काम पूर्ण न केल्यास थांबेल तुमचे पेन्शन

पेन्शनधारकांसाठी अलर्ट! 31 डिसेंबरपूर्वी हे काम पूर्ण न केल्यास थांबेल तुमचे पेन्शन

यावर्षी ऑफलाइन पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत आहे. मात्र ऑनलाइन माध्यमातून तुम्ही कधीही लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकता.

    नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर: जर तुम्ही पेन्शनधारक आहात आणि तुमचे लाइफ सर्टिफिकेट जमा झाले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण पेन्शनधारकांना पेन्शन मिळावे याकरता लाइफ सर्टिफिकेट नोव्हेंबर महिन्यात जमा करावे लागते. लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate) अर्थात जीवन प्रमाणपत्र म्हणजे पेन्शनधारक जिवंत असल्याचा पुरावा असतो. पेन्शनधारकांना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये  जाऊन हे सर्टिफिकेट जमा करावे लागते. मात्र आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्याच हे सर्टिफिकेट जमा करता यावे याकरता ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली आहे. यावर्षी ऑफलाइन पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याचा कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत आहे. मात्र ऑनलाइन माध्यमातून तुम्ही कधीही लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकता. सर्टिफिकेट जमा केल्यानंतर वर्षभरासाठी हे जीवन प्रमाणपत्र वैध असते. देशभरात जवळपास 64 लाख पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र जमा करतात. असे जमा करा ऑनलाइन प्रमाणपत्र -लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन पेन्शन डिस्बर्सिंग बँक, उमंग App किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून सबमिट करता येईल. - डिजिटल सर्टिफिकेटसाठी पेन्शनर्सना युनिक प्रमाण आयडी जनरेट करावा लागेल. आधार क्रमांक आणि बायोमेट्रिकच्या माध्यमातून हे काम करता येईल. (हे वाचा-डाळींच्या किंमती घसरल्या, 20 टक्क्यांपर्यंत झाल्या स्वस्त) -पहिल्यांदा आयडी जनरेट करण्यासाठी लोकल सिटिझन सर्व्हिस सेंटर जाऊ शकता ज्याठिकाणी आधार ट्रान्झॅक्शन केले जाते. याशिवाय तुम्ही पेन्शन डिस्बर्सिंग एजन्सीच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकता -पेन्शनर्सना त्यांचा आधार नंबर, मोबाइल नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि पेन्शन अकाउंट नंबर देण्याबरोबरच बायोमेट्रिक देखील द्यावे लागेल. यानंतर नोंदणीबाबतचा एक SMS तुमच्या मोबाइलवर येईल. यामध्ये तुमचा प्रमाण ID असेल. (हे वाचा-जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून करा ऑफिसचं काम, ही भारतीय कंपनी आखतेय योजना) -हा आयडी जनरेट झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन डिस्बर्सिंग एजन्सीकडे लाइफ सर्टिफिकेट जमा  करण्याची गरज नाही. तुम्ही पोर्टल https://jeevanpramaan.gov.in इथे जाऊन डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता -एजन्सीला या पोर्टलवरून तुमचे प्रमाणपत्र मिळेल. Umang Appच्या माध्यमातून पेन्शनधारक मोबाइलवर देखील लाइफ सर्टिफिकेट जनरेट करू शकता. Umang Appवर अशा पद्धतीने बनवा लाइफ सर्टिफिकेट -गुगल प्लेस्टोअरवर Umang App डाऊनलोड करा. त्यानंतर यामध्ये जीवन प्रमाणपत्र सेवा सर्च करा. यानंतर तुमच्या मोबाइलला बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट करा. (हे वाचा-LPG Cylinder: मोबाइल क्रमांक लिंक नसला तरीही मिळेल घरगुती गॅस सिलेंडर?) -जीवन प्रमाणपत्र सुविधेअंतर्गत देण्यात आलेल्या General Life Certificate टॅबवर क्लिक करा. याठिकाणी पेन्शन प्रमाणीकरण टॅबमध्ये तुमचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक दिसेल. दोन्ही बाबी बरोबर असतील तर जेनरेट ओटीपीवर क्लिक करा. -त्यानंतर याठिकाणी तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी सबमिट करा. त्यानंतर बायोमेट्रिक डिव्हाइसच्या मदतीन फिंगरप्रिंट स्कॅन करा -बोटांचे ठसे जुळल्यानंतर तुमचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार होईल. सर्टिफिकेट पाहण्यासाठी तुम्ही व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करू शकता. आधार क्रमांकाच्या साहाय्याने सर्टिफिकेट पाहता येईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Pension, Pension funds, Pension scheme

    पुढील बातम्या