मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Success Story: पित्याचं कर्ज फेडण्यासाठी 'तो' होता नोकरीच्या शोधात, आता उभी केली 70 हजार कोटींची कंपनी

Success Story: पित्याचं कर्ज फेडण्यासाठी 'तो' होता नोकरीच्या शोधात, आता उभी केली 70 हजार कोटींची कंपनी

त्यांनी 2017 अखेरीस मॅटिक (Matic) ची सुरुवात केली. ते कोणत्याही मोठ्या इंजिनिअरींग इन्स्टिट्यूटमधून नसल्याने सुरुवातीला त्यांच्या फर्मसाठी गुंतवणूकदार मिळणं फार कठीण होतं असल्याचं ते सांगतात. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि आज त्यांच्याकडे फंडिंगची कमतरता नाही आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 10 जून: स्टार्टअप्सच्या कहाण्या (Start-ups Stories) अनेकांसाठी प्रेरणादायी असतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी (Start-ups in India) आहे, जी इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे. या व्यक्तीच्या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन अलीकडेच 10 अब्ज डॉलर अर्थात जवळपास 70 हजार कोटींपेक्षा अधिकच्या स्तरावर पोहोचलं आहे.

देशात बनलेल्या क्रिप्टोकरन्सी प्रोटोकॉल, Polygon चे सहसंस्थापक आणि सीईओ जयंती कनानी (Jaynti Kanani) यांचं बालपण अत्यंत खडतर होतं. गुजरातमधील अहमदाबाद बाहेरील परिसरात ते राहत होते आणि त्यांचे वडील एक डायमंड मार्केटमध्ये वर्कर म्हणून काम करत असत. कनानी यांना एक चांगली नोकरी मिळवायची होती, जेणेकरून त्यांना वडिलांनी काढलेलं कर्ज फेडता येईल. मात्र त्यावेळी त्यांनाही माहित नव्हतं त्यांच्या नशिबात त्याहीपेक्षा खूप काही आहे.

फर्मसाठी इन्व्हेस्टर शोधणं कठीण होऊन बसलं होतं

कनानी यांनी अशी माहिती दिली की 2017 साली ते हाउसिंग डॉटकॉमध्ये नोकरी करत होते. Ethereum ब्लॉकचेनवर असणारा जबरदस्त लोड पाहता त्यांनी 2017 अखेरीस मॅटिक (Matic) ची सुरुवात केली. ते कोणत्याही मोठ्या इंजिनिअरींग इन्स्टिट्यूटमधून नसल्याने सुरुवातीला त्यांच्या फर्मसाठी गुंतवणूकदार मिळणं फार कठीण होतं असल्याचं ते सांगतात. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि आज त्यांच्याकडे फंडिंगची कमतरता नाही आहे.

हे वाचा-मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खरीप हंगामासाठी MSP मध्ये घसघशीत वाढ

शाळेची फी देणंही होतं मुश्कील तरी जिद्दीने पूर्ण केलं इंजिनिअरींग

त्यांनी असे म्हटले की वडिलांचं उत्पन्न कमी असल्याने कधीकधी शाळेची फी भरणंही कठीण होऊन जायचं. त्यांनी कठीण परिस्थितीत अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वत:च्या फर्मचे जे यश पाहिले आहे ते कुणाच्या ध्यानीमनीही नसेल.

त्यांच्या कंपनीची सुरुवात कनानी, संदीप नेलवाल आणि अनुराग अर्जुन यांनी 2017 मध्ये  Matic Network म्हणून केली होती. त्यानंतर सर्बियाचे इंजिनिअर मिहालियो जेलिक सह-संस्थापक म्हणून त्यांच्याशी जोडले गेले. ही फर्म अलीकडेच चर्चेत आली होती जेव्हा बिलेनिअर मार्क क्युबान (Mark Cuban) कडून यामध्ये गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली. याआधी Polygon ला एंजल इन्व्हेस्टर बालाजी श्रीनिवासन यांच्याकडून फंडिंग मिळाली होती. या फर्मचे लक्ष्य होते की Ethereum ब्लॉकचेन वर त्वरीत आणि स्वस्त ट्रान्झॅक्शन उपलब्ध करणे.

हे वाचा-Explained :झटपट श्रीमंत बनवणारी क्रिप्टोकरन्सी वादग्रस्त का?भारतात काय आहे नियम

कनानी यांनी Polygon साठी योजना आणि Cuban च्या गुंतवणुकीबाबत कंपनीच्या संस्थापकांशी चर्चा केली. कनानी यांनी अशी माहिती दिली फर्ममध्ये गुंतवणूक करण्याआधी Cuban त्याचे युजर होते. त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं की ते गुंतवणूक करू इच्छितात का आणि ते तयार झाले.

First published:

Tags: Investment, Money, Small business