मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मोदी सरकारच्या मदतीने सुरू करा हा व्यवसाय, होईल 50000 रुपयांचा नफा; वाचा काय आहे प्रोसेस?

मोदी सरकारच्या मदतीने सुरू करा हा व्यवसाय, होईल 50000 रुपयांचा नफा; वाचा काय आहे प्रोसेस?

आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया सांगणार आहोत, ज्या प्रोडक्टची मागणी वर्षभर आणि सर्वत्र असते. हा व्यवसाय आहे साबण बनवण्याच्या फॅक्ट्रीचा किंवा साबण मॅन्युफॅक्चरिंग यूनिट (soap manufacturing unit) चा.

आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया सांगणार आहोत, ज्या प्रोडक्टची मागणी वर्षभर आणि सर्वत्र असते. हा व्यवसाय आहे साबण बनवण्याच्या फॅक्ट्रीचा किंवा साबण मॅन्युफॅक्चरिंग यूनिट (soap manufacturing unit) चा.

आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया सांगणार आहोत, ज्या प्रोडक्टची मागणी वर्षभर आणि सर्वत्र असते. हा व्यवसाय आहे साबण बनवण्याच्या फॅक्ट्रीचा किंवा साबण मॅन्युफॅक्चरिंग यूनिट (soap manufacturing unit) चा.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 07 डिसेंबर: तुम्ही एखादा स्वत:चा व्यवसाय सुरू (Start Your own Business) करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया सांगणार आहोत, ज्या प्रोडक्टची मागणी वर्षभर आणि सर्वत्र असते. हा व्यवसाय आहे साबण बनवण्याच्या फॅक्ट्रीचा किंवा साबण मॅन्युफॅक्चरिंग यूनिट (soap manufacturing unit) चा. जाणून घ्या सविस्तर

काय आहे सोप मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस

या व्यवसायात मशिनरीजच्या मदतीने साबण बनवले जातात आणि ते बाजारापर्यंत पोहोचवले जातात. काही ठिकाणी हँडमेड साबण बनवण्याचा व्यवसाय देखील तेजीत (Earn Money from Business) आहे. या व्यवसायातील सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्ही छोट्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करू शकता. भारतातील मार्केटमध्ये विविध कॅटेगरींमध्ये साबणाची विक्री केली जाते. तुम्ही मागणी लक्षात घेऊन कोणत्याही एका कॅटेगरीतील उत्पादन सुरू करू शकता.

भारतातील मार्केटमध्ये आहेत या साबणाच्या कॅटेगरी

लाँड्री सोप (Laundry Soap)

ब्यूटी सोप (Beauty Soap)

मेडिकेटेड सोप (Medicated Soap)

किचन सोप (Kitchen Soap)

परफ्यूम्ड सोप (Perfumed Soap)

हे वाचा-MapmyIndia IPO ची प्राईज बँड निश्चित, 9 डिसेंबरला इश्यू ओपन होणार

4 लाखात सुरू करा व्यवसाय

साबणाची मागणी ही खेडेगाव, छोटी शहर ते मोठ्या शहरांपर्यंत सर्वत्र आहे. त्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकारची योजना असणाऱ्या मुद्रा स्कीमअंतर्गत 80 टक्के कर्ज घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला इतरही फायदे मिळतील.

किती होईल कमाई?

केंद्र सरकारच्या मुद्रा स्कीम प्रोजेक्ट प्रोफाइलच्या मते, तुम्ही वर्षभरात जवळपास 4 लाख किलोपर्यंतचे एकूण प्रोडक्शन करू शकता. याची व्हॅल्यू जवळपास 47 लाख रुपये असेल. व्यवसायातील सर्व खर्च आणि अन्य पैसे चुकते केल्यानंतर तुम्हाला सहा लाख रुपये अर्थात दरमहा 50000 रुपयांचा थेट नफा होईल.

मशिन्सवर किती येईल खर्च?

साबण बनवण्याचे युनिट सेट करण्यासाठी तुम्हाला एकूण 750 चौरस फूट जागेची गरज लागेल. यापैकी 500 चौरस फूटावर छत असले पाहिजे आणि उर्वरित छताशिवाय. यासाठी सर्व प्रकारच्या मशिन्ससह 8 प्रकारची उपकरणे लागतील. या मशिन्स बसवण्यासाठी एकूण एक लाख रुपये खर्च येणार असल्याचे प्रकल्प अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हे वाचा-₹19 चा स्टॉक पोहोचला 494 रुपयांवर! 6 महिन्यातच गुंतवणूकदारांना केलं मालामाल

कोणत्याही बँकेतून मिळेल कर्ज

साबण तयार करण्याचे एक उत्पादन युनिट उभारण्यासाठी एकूण 15,30,000 रुपये खर्च केले जातात. यामध्ये युनिटचे स्थान, यंत्रसामग्री, तीन महिन्यांचे वर्किंग कॅपिटल यांचा समावेश आहे. या 15.30 लाख रुपयांपैकी तुम्हाला फक्त 3.82 लाख रुपये खर्च करावे लागतील. उर्वरित रक्कम तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज म्हणून घेऊ शकता.

First published:

Tags: Business, Money, Small business