• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • तुमच्याकडे 1 रुपयाची नोट आहे? घरबसल्या 45 हजार कमवण्याची संधी, करा फक्त एक काम

तुमच्याकडे 1 रुपयाची नोट आहे? घरबसल्या 45 हजार कमवण्याची संधी, करा फक्त एक काम

भारत सरकारकडून ही एक रुपयाची नोट चलनातून बंद करण्यात आली असली, तरी आता मात्र बाजारात याची किमत हजारोंच्या घरात आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 9 मे : अनेकांना जुन्या नोटा-नाणी जमा करण्याचा छंद असतो. हाच छंद तुम्हाला पैसे कमावून देऊ शकतो. जर तुमच्याकडे ही 1 रुपयाची जुनी नोट असेल, तर तुम्ही घरबसल्या पैसे कमावू शकता. भारत सरकारकडून ही एक रुपयाची नोट चलनातून बंद करण्यात आली असली, तरी आता मात्र बाजारात याची किमत हजारोंच्या घरात आहे. या 1 रुपयाच्या नोटेची ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 45 हजार रुपयांना विक्री होत आहे. या नोटवर 1957 मध्ये गव्हर्नर एचएम पटेल यांची सही आहे. याचा नोटेचा सिरीयल नंबर 123456 आहे. ही एक रुपयाची नोट Coinbazzar वेबसाईटवर विक्री होत आहे. येथे जुन्या 1 रुपयाच्या बंडलची मूळ किंमत 49,999 रुपये आहे. डिस्काउंटनंतर वेबसाईटने किंमत 44,999 रुपये इतकी ठरवली आहे. यासाठी या वेबसाईटच्या शॉप सेक्शनमध्ये (Shop Section) जावं लागेल. त्यानंतर "नोट बंडल" कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर येथे संपूर्ण डिटेल्स दिसतील. 26 वर्षांपूर्वी भारत सरकारने ही एक रुपयाची नोट चलनातून बंद केली होती. 1 जानेवारी 2015 मध्ये याची छपाई पुन्हा सुरू झाली. अनेकांकडे या नोटा अद्यापही आहेत. ज्या वर्षातील नोट हवी आहे, ती येथे खरेदी करता येऊ शकते.

  (वाचा - कोरोना संकटात GOOD NEWS; केवळ 9 रुपयांत बुक करा LPG Gas cylinder; असं करा पेमेंट)

  या प्लॅटफॉर्मवर एक नोट अशीही आहे, जी भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीची आहे आणि याची बोली सात लाख रुपयांपर्यंत लावण्यात आली आहे. अशाप्रकारच्या जुन्या नोटा तुमच्याकडेही असतील, तर तुम्हीही मोठी रक्कम कमावू शकता. अनेक वर्षांपूर्वीची 1, 10, 100 आणि 500 रुपयांची नोट ऑनलाईन बाजारात हजारो-लाखोंमध्ये विक्री होत आहे.

  (वाचा - डेअरी व्यवसायातून महिन्याला होईल 70 हजार कमाई, सरकारही करेल मदत)

  कसं कराल ऑनलाईन लिलाव - जुनी नाणी किंवा नोटांच्या लिलावासाठी OLX किंवा India Mart ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चेक करू शकता. येथे जुन्या नोटांची विक्री होते. या प्लॅटफॉर्मवर लॉगइन आयडी बनवावा लागेल. त्याशिवाय indiamart.com वरही अशाप्रकारे अकाउंट बनवून लिलाव करुन पैसे कमावू शकता. लिलावासाठी तुमच्याकडे असलेल्या नोटेचा फोटो शेअर करावा लागेल. अनेक लोक अँटिक सामानाचीही खरेदी करतात.
  Published by:Karishma Bhurke
  First published: