मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लॉकडाऊन असूनही या झोनमध्ये ऑनलाइन खरेदी करू शकाल मोबाइलसह इतर वस्तू, वाचा सविस्तर

लॉकडाऊन असूनही या झोनमध्ये ऑनलाइन खरेदी करू शकाल मोबाइलसह इतर वस्तू, वाचा सविस्तर

केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील शहरांमध्ये ई-कॉमर्स (e-Commerce) कंपन्यांना सूट देण्यात आली आहे

केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील शहरांमध्ये ई-कॉमर्स (e-Commerce) कंपन्यांना सूट देण्यात आली आहे

केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील शहरांमध्ये ई-कॉमर्स (e-Commerce) कंपन्यांना सूट देण्यात आली आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 02 मे : केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील शहरांमध्ये ई-कॉमर्स (e-Commerce) कंपन्यांना सूट देण्यात आली आहे. सरकारच्या या आदेशानंतर ई-कॉमर्स कंपन्या त्यांची विविध कामं पुन्हा एकदा सुरू करण्यामागेल लागल्या आहेत. कारण आता पुन्हा एकदा अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त असणाऱ्या इतर वस्तूंची देखील विक्री होणार आहे. ज्या वस्तू लॉकडाऊनमुळे खरेदी करता नाही आल्या अशा वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता.  ग्रीन आणि रेड झोनमध्ये लोकं ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून स्मार्टफोन, लॅपटॉप, एसी, फ्रिज, कंप्यूटर हार्डवेअर यासारख्या अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची खरेदी करता येईल. मात्र रेड झोनमध्ये या कंपन्या केवळ अत्यावश्यक वस्तूंचाच पुरवठा करू शकतात.

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारच्या या आदेशानंतर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ई-कॉमर्स कंपन्या सुरक्षित पद्धतीने वस्तूंची डिलिव्हरी करू शकेल. यासाठी त्यांची कंपनी देखील विशेष लक्ष ठेवणार आहे.

(हे वाचा-मोदी सरकारची महत्त्वाची बैठक,लवकरच दुसऱ्या आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता)

त्यांनी अशी माहिती दिली की यामुळे छोट्या आणि मध्यम स्तरावरील काही व्यवहार पुन्हा सुरू होतील, त्यांचा व्यवसाय पुन्हा एकदा सुरू होईल. यावेळी ग्राहकांची, कर्मचाऱ्यांची आणि पार्टनर्सची सुरक्षा याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. दरम्यान रेड झोनमध्ये अद्याप अत्यावश्यक सेवांचाच पुरवठा करण्यात येणार आहे.

सरकारकडे आर्थिक पॅकेज देण्याची मागणी

एका जाणकाराने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन विक्रीचा सर्वात मोठा हिस्सा त्या भागातून मिळतो जे सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे सरकारकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम स्तरावरील व्यापारासाठी आर्थिक पॅकेजची मागणी केली जात आहे.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी खात्यांमध्ये पाठवले पैसे,वाचा कशी काढाल रक्कम)

ई-कॉमर्स कंपन्यांचं असं म्हणणं आहे की, त्यांच्याकडून रेड झोन आणि इतर झोनमध्ये देखील सरकारी गाइडलाइन्सचे पालन करून व्यवहार सुरू ठेवण्यात येईल, मात्र आता वेळ आली आहे की सरकारने देखील या ई-कॉमर्स कंपन्यांसाठी काही ठोस पावलं उचलावीत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मजबुतीने सहकार्य केलं जाईल.

4 मेपासून लॉकडाऊनचा तिसरा (Coronavirus Lockdown 3) टप्पा सुरू होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे हा लॉकडाऊन 4 मेपासून 17 मेपर्यंत असणार आहे. याशिवाय मंत्रालयाने या कालावधीत असणाऱ्या निर्बंधाबाबत एक गाइडलाइनही प्रसिद्ध केली आहे. लॉकडाऊन 3 मध्ये देशाची विभागणी तीन झोनमध्ये कऱण्यात आली आहे. यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनचा समावेश आहे. या सर्वांसाठी वेगवेगळ्या गाइडलाइन आहेत. यात ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही बाबतीत सूट देण्यता आली आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published:

Tags: Coronavirus