Home /News /money /

सावधान! कोरोना काळात 28 टक्क्यांनी वाढले Online Fraud, देशाचं 25 हजार कोटींचं नुकसान

सावधान! कोरोना काळात 28 टक्क्यांनी वाढले Online Fraud, देशाचं 25 हजार कोटींचं नुकसान

Digital Frauds in India: कोरोना काळात देशात डिजिटल ट्रान्झॅक्शनद्वारे (Digital Transaction) आर्थिक देवाण-घेवाण वाढलेली असताना फसवणुकीच्या केसेस देखील 28 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

नवी दिल्ली, 11 जून: सध्याच्या कोरोनाकाळात (Corona) आरोग्य आणि अर्थिक समस्यांसोबतच अन्य अनेक समस्या वेगाने गंभीर रुप धारण करताना दिसत आहेत. या समस्यांमध्ये प्रमुख आहे ती ऑनलाईन सायबर फ्रॉड (Cyber Fraud). सध्या या फ्रॉडच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. कोरोना काळात देशात डिजिटल ट्रान्झॅक्शनद्वारे (Digital Transaction) आर्थिक देवाण-घेवाण वाढलेली असताना फसवणुकीच्या केसेस देखील 28 टक्क्यांनी वाढल्या आहेत. एका मीडिया अहवालानुसार, सायबर फ्रॉडच्या घटनांमुळे गतवर्षी देशाचे सुमारे 25 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मागील आर्थिक वर्षात देशात सायबर फ्रॉडमुळे सर्वाधिक 6 ते 7 हजार कोटींचे नुकसान एकट्या दिल्लीचे (Delhi) झाले आहे. त्यानंतर मुंबईचे (Mumbai) 5 ते 6 हजार कोटी, गुजरातचे (Gujarat) 4 ते 5 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या यादीत मुंबई आणि गुजरात अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असल्याचे ग्लोबल इन्फॉर्मेशन कंपनी ट्रान्सयुनियनच्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. इंटेलिजन्स (Intelligence) आधारित उद्योगातील व्यवहारातून सर्वाधिक सायबर फ्रॉड एका अहवालानुसार, इंटेलिजन्स आधारित उद्योगांमधील देवाणघेवाणीत सर्वाधिक सायबर फ्रॉड झाले आहेत. भारतात सर्वाधिक नुकसान लॉजिस्टिक सेक्टरला (Logistics Sector) सहन करावे लागले आहे. या सेक्टरमध्ये डिजिटल फ्रॉड सर्वाधिक 24 टक्क्यांनी वाढला आहे. इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस कंपनी एक्सपिरीयनच्या एका अहवालानुसार, भारतात कोरोना महामारीदरम्यान उद्योग विश्वाने 46 टक्के अधिक सायबर फ्रॉडच्या आव्हानाचा सामना केला आहे. हे वाचा-या महिन्यात आहे LPG गॅस सिलेंडर स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पूर्ण करा हे काम कोरोनाकाळात मोठे ऑनलाईन फ्रॉड कोरोना संकटात लोकांनी ऑनलाईन (Online) खरेदीस प्राधान्य दिले. या वाढीमुळे सहाजिकच सायबर फ्रॉडच्या केसेस अनेक पटींनी वाढल्या. कोरोना येण्यापूर्वी एकूण सायबर फ्रॉडमध्ये ऑनलाईन खरेदीशी निगडीत फ्रॉडचा वाटा 5 ते 7 टक्के होता. तो आता वाढून सुमारे 20 टक्के झाला आहे. लॉजिस्टीक आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये सर्वाधिक सायबर फ्रॉड लॉजिस्टीक आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये (Telecom Sector) सायबर फ्रॉडचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. लॉजिस्टीक सेक्टरमध्ये 224 टक्के तर टेलिकॉम सेक्टरमध्ये 200 टक्क्यांनी सायबर फ्रॉड वाढले आहेत. अर्थिक सेवा क्षेत्रात 90 टक्के, उत्पादन क्षेत्रात 20 तर कॉर्पोरेट क्षेत्रात 15 टक्के फ्रॉड वाढले आहेत. हे वाचा-तुमच्या सोबत पैशांच्या बाबतीत Fraud झाला आहे? इथे करा तक्रार, पूर्ण पैसे मिळतील फसवणुकीचे प्रमुख प्रकार - सोशल मिडीयावर अनेक उत्पादनांवर मोठी सूट देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांकडून बॅंकेचे डिटेल्स मिळवत फ्रॉड केला जातो. - सायबर गुन्हेगार लॉजिस्टीकला सर्वाधिक लक्ष्य करीत असून ओरिजनल ऑर्डरचे रुपांतर खोट्या ऑर्डर्समध्ये करीत आहेत. - मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना (Manufacturer Companies) प्रॉडक्ट मेथडची चोरी आणि गुणवत्तेत बदलाचा सामना करावा लागत आहे. - फार्मास्युटिकल क्षेत्र देखील सातत्याने होणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे त्रस्त आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Corona hotspot, Coronavirus, Lockdown, Online crime, Online fraud

पुढील बातम्या