मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कोरोनामुळे कर्जाचे हप्ते फेडण्यास समस्या? RBI अशी करेल मदत

कोरोनामुळे कर्जाचे हप्ते फेडण्यास समस्या? RBI अशी करेल मदत

लॉकडाउन काळात देण्यात आलेला लोन मोरेटोरियमचा कालावधी संपल्यानंतरही अद्याप अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत, तर जॉब गेल्याने लोनचे ईएमआय भरण्यास अनेक जण असमर्थ आहेत. अशा लोकांसाठी आरबीआयने खास स्कीम आणली आहे.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांना कर्जाचे हप्ते फेडताना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. लॉकडाउन काळात देण्यात आलेला लोन मोरेटोरियमचा कालावधी संपल्यानंतरही अद्याप अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत, तर जॉब गेल्याने लोनचे ईएमआय भरण्यास अनेक जण असमर्थ आहेत. अशा लोकांसाठी आरबीआयने खास स्कीम आणली आहे. कोरोना-लॉकडाउनमुळे कर्जाचे हप्ते फेडण्यास असमर्थ असणारे कर्जदार यावर मार्ग काढण्यासाठी अर्ज करू शकतात, असं भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) स्पष्ट केलं आहे.

FAQ -

आरबीआयने यासंबंधी एक एफएक्यू (frequently asked questions-FAQ) जारी केलं आहे. कर्जदार, कर्ज देणाऱ्या संस्थांसमोर यावरील समाधानासाठी एक अर्ज भरून ही प्रक्रिया सुरू करू शकतात. अशा अर्जांवर, कर्ज देणारी संस्था त्यांच्या संचालक मंडळाच्या व्यवस्थेखाली निर्णय घेईल.

(वाचा - 1 जानेवारीपासून बदलणार Cheque पेमेंट करण्याचा नियम)

Loan Restucturing Scheme -

बँकांनी Loan Restucturing सुविधा सुरू केली आहे. बँकेच्या ब्राँच किंवा ऑनलाईनद्वारे या सुविधेचा फायदा घेता येऊ शकतो. बँक अधिकारी यात संपूर्ण मदत करतील. या सुविधेंतर्गत, बँक ग्राहकाच्या लोनचं रिपेमेंट शेड्यूल बदलू शकेल. यात कर्जाचा कालावधी वाढवणं, पेमेंट हॉलिडे देण्याचा पर्याय असेल.

(वाचा - कोरोना काळात देशात स्मार्टफोनचा वापर वाढला; भारतीय रोज सरासरी इतका वेळ घालवतात)

गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्जाची रिस्ट्रक्चरिंग होऊ शकते. गोल्ड लोन, पर्सनल लोनच्या EMI साठी पर्याय असतील. कंज्यूमर ड्युरेबर लोन, लोन अगेंस्ट सिक्योरिटीजही यात सामिल असेल. ग्राहकांचा ईएमआय काही महिन्यांसाठी कमी होईल किंवा काही महिन्यांसाठी ईएमआय टळूही शकेल.

First published:

Tags: Lockdown, Pay the loan, Rbi