कोरोना काळात देशात स्मार्टफोनचा वापर वाढला; भारतीय रोज सरासरी इतका वेळ घालवतात

कोरोना काळात देशात स्मार्टफोनचा वापर वाढला; भारतीय रोज सरासरी इतका वेळ घालवतात

लॉकडाउननंतर भारतीय आपल्या स्मार्टफोनवर अधिक वेळ घालवतात. वर्क फ्रॉम होमसाठी स्मार्टफोनचा वापर 75 टक्क्यांनी वाढला आहे. तर कॉलिंगसाठी 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे नेटफ्लिक्स, स्पॉटिफायसारख्या ओव्हर द टॉप सेवांसाठी स्मार्टफोनच्या वापरात 59 टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : कोरोना काळात स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. भारतीय स्मार्टफोनवर प्रतिदिन सरासरी सात तास वेळ घालवतात. एका अभ्यासातून, भारतीयांकडून स्मार्टफोनच्या वापरात 25 टक्के वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम आणि मनोरंजन आणि इतर गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. लोक आपल्या गरजेनुसार या गॅजेट्सचा वापर करतात. सीएमआरने मोबाईल कंपनी वीवोच्या वतीने हा अभ्यास केला आहे. मार्च 2020 मध्ये भारतीयांकडून स्मार्टफोनचा वापर 11 टक्क्यांनी वाढून 5.5 तास प्रतिदिनवर पोहचला. तर एप्रिलमध्ये 25 टक्के आणखी वाढून 6.9 तास प्रतिदिनवर पोहचला. हाच वेळ 2019 मध्ये सरासरी 4.9 तास असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

OTT साठी 59 टक्के वापर वाढला -

स्मार्टफोन आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा परिणाम - 2020 या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउननंतर भारतीय आपल्या स्मार्टफोनवर अधिक वेळ घालवतात. वर्क फ्रॉम होमसाठी स्मार्टफोनचा वापर 75 टक्क्यांनी वाढला आहे. तर कॉलिंगसाठी 63 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे नेटफ्लिक्स, स्पॉटिफायसारख्या ओव्हर द टॉप सेवांसाठी स्मार्टफोनच्या वापरात 59 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसंच सोशल मीडियासाठी स्मार्टफोनचा वापर 55 टक्क्यांनी वाढला आहे.

गेमिंग -

लॉकडाउनमध्ये स्मार्टफोनवर गेम खेळण्याचं प्रमाणही वाढलं आहे. गेमिंगसाठी यात 45 टक्क्यांची वाढ झाली आहे. अध्ययनात आणखी एक बाब समोर आली आहे. फोटो काढण्यासाठी आणि सेल्फी घेण्यासाठी स्मार्टफोनचा वापर प्रतिदिन 14 मिनिटांनी वाढून 18 मिनिटांवर पोहचला आहे. या अभ्यासात आठ शहरांतील 15 ते 45 वयोगटातील जवळपास 2000 लोकांची मतं घेण्यात आली. यात 70 टक्के पुरुष आणि 30 टक्के महिलांचा समावेश आहे.

कोरोनानंतर बदल कठीण -

वीवो इंडियाचे संचालक निपुण मार्या यांनी सांगितलं की, 'कंपनीने अशाच प्रकारचं अध्ययन गेल्या वर्षीही केलं होतं. स्मार्टफोन हे सर्वात उत्तम माध्यम असल्याचं सर्वच जाणतात. खासकरून कोरोना काळात स्मार्टफोन अतिशय महत्त्वाचा ठरला. परंतु स्मार्टफोनच्या अति वापराचा प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळेच आम्ही हे अध्ययन करण्याचा निर्णय घेतल्याचं' मार्या यांनी सांगितलं.

'स्मार्टफोन एडिक्शन बनतो आहे. 84 टक्के लोकांनी ते सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पहिले 15 मिनिटं फोन बघत असल्याचं सांगितलं. 46 लोकांनी, ते मित्रांसोबत एका तासाच्या बैठकीवेळी कमीत-कमी पाच वेळा आपला फोन उचलतात, असं सांगितलं. कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाल्यानंतर स्मार्टफोनच्या वापरात काहीशी कमी येईल, काही बदल होतील, परंतु कोरोना काळात झालेले काही बदल कायम राहतील' असं मार्या यांनी म्हटलंय.

Published by: Karishma Bhurke
First published: December 14, 2020, 9:21 AM IST

ताज्या बातम्या