• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • PM Kisan: या चुकांमुळे मोदी सरकारकडून मिळणाऱ्या 2000 रुपयांना मुकाल, तुम्ही अशा चुका करताय का?

PM Kisan: या चुकांमुळे मोदी सरकारकडून मिळणाऱ्या 2000 रुपयांना मुकाल, तुम्ही अशा चुका करताय का?

देशभरात असे अनेक शेतकरी असे आहेत, जे पात्र असून त्यांना या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही. काही शेतकऱ्यांनी अर्ज करून देखील ही मदत मिळालेली नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 जून: मोदी सरकारकडून छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू करण्यात आली आहे. मात्र काही कारणास्तव हे पैसे अडकू शकतात. चिंतेचं कारण नाही कारण सरकारकडून हे पैसे रोखले जात नसून शेतकऱ्यांच्या काही छोट्या चुकीमुळे हे पैसे अडकत आहेत. पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात. ज्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे त्यांना हे पैसे पाठवले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्ते पाठवण्यात आले आहेत. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरता नोंदणी आवश्यक आहे. शिवाय तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. हे वाचा-1 जुलैपासून हे आर्थिक नियम बदलणार, तुमच्या जीवनावर करणार थेट परिणाम अनेक शेतकऱ्यांना नाही मिळाला फायदा अद्याप असेही काही शेतकरी आहेत, ज्यांना या योजनेचा फायदा मिळालेला नाही. त्यांनी अर्ज करूनही ही मदत मिळालेली नाही. कृषी विभागाने केंद्र सरकारकडे पाठवलेल्या काही फॉर्ममध्ये PFMS द्वारे निधी हस्तांतरित करताना अनेक चुका आढळल्या आहेत, ज्यामुळे हप्त्याची रक्कम हस्तांतरित होत नाही आहे. या प्रकरणात तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्याची आवश्यकता आहे. वाचा काय आहेत चुका -शेतकऱ्यांना नाव इंग्रजीमध्ये लिहिणं आवश्यक आहे, तुम्ही इतर भाषेत नाव लिहिलं असेल तर ते बदलणं गरजेचं आहे. -शेतकऱ्याचं खातं आणि अर्जावरील नावात कोणतीही स्पेलिंग मिस्टेक असता कामा नये -बँकेचा IFSC कोड लिहण्यासाठी कोणतीही चूक करू नका -बँक खात्याची माहिती देतानाही कोणतीही चूक करू नका -तुमचा पत्ता, गावाच्या नावाची स्पेलिंग देखील योग्यपणे तपासा हे वाचा-SBI च्या 40 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी अलर्ट! आता ATM मधून पैसे काढणं महागणार ऑनलाइन कशाप्रकारे सुधाराल चुका? तुम्ही या चुका आधारच्या साहाय्याने दुरुस्त करू शकता. सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल. त्याठिकाणी फार्मर्स कॉर्नरवर जाऊन क्लिक करा. त्याठिकाणी आधार एडिटची एक लिंक दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यानंतर जे पेज ओपन होईल त्याठिकाणी तुम्ही आधार क्रमांक दुरुस्त करू शकता, तर खातेक्रमांक चुकीचा असेल तर तो देखील सुधारू शकता. शिवाय तुम्ही कृषी विभाग कार्यालय किंवा लेखापाल यांच्याशी देखील संपर्क करू शकता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: