Home /News /money /

70 लाख शेतकऱ्यांना छोटीशी चूक पडली महागात! मिळाले नाहीत मोदी सरकारच्या या योजनेचे पैसे

70 लाख शेतकऱ्यांना छोटीशी चूक पडली महागात! मिळाले नाहीत मोदी सरकारच्या या योजनेचे पैसे

कागदपत्र भरताना झालेली एक छोटीशी चूक शेतकऱ्यांना महागात पडली आहे. 70 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे

    नवी दिल्ली, 16 जुलै : कागदपत्र भरताना झालेली एक छोटीशी चूक शेतकऱ्यांना महागात पडली आहे. 70 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. कागदपत्रे भरताना झालेल्या छोट्याशा चुकीमुळे शेतकऱ्यांना जवळपास 4200 कोटी रुपये सहाय्यता निधीचा फटका बसला आहे. जेव्हा ही चूक सुधारण्यात येईल तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येची मदत शेतकऱ्यांना मिळेल. मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) हा प्रकार घडला आहे. जोपर्यंत ही चूक सुधारली जाणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना ही मदत मिळणार नाही. कुठे झाली चूक? या योजनेच्या अर्जदारांच्या नावामध्ये आणि बँक अकाऊंट नंबरमध्ये हा घोळ झाला आहे. बँक खाते आणि अन्य कागदपत्रांवर नावाचा गोंधळ झाला आहे . (हे वाचा-85 दिवसात JIOमध्ये एकूण 1,52,056 कोटींची गुंतवणूक, हे आहेत मोठे गुंतवणूकदार) ज्यामुळे या योजनेसाठी असणारी ऑटोमॅटिक व्यवस्था ही कागदपत्र पास करत नाही आहे. PM शेतकरी सन्मान निधी योजनेचे सीईओ विवेक अग्रवाल यांनी News18शी बोलताना अशी माहिती दिली की, 'अशी चूक करणारे अर्जदार शेतकरी जवळपास 70 लाख आहेत. तर 60 लाख शेतकऱ्यांच्या आधार कार्डमध्ये (Aadhar Card) मध्ये गडबड आहे. व्हेरिफिकेशनसाठी सव्वा कोटी प्रकरण प्रलंबित या योजनेसाठी अर्ज केल्यानंतरही देशातील जवळपास 1.3 कोटी शेतकरी वार्षिक 6000 रुपये मिळण्यापासून वंचित आहेत. काही जिल्हे असे आहेत की, ज्याठिकाणी सव्वा-सव्वा लाख शेतकऱ्यांची माहिती व्हेरिफिकेशनसाठी प्रलंबित आहे. जेव्हा राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची माहिती तपासली जाते त्यानंतरच ती केंद्राकडे पाठवली जाते आणि मग शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. कशी सुधाराल चुक? -सर्वात आधी PM-Kisan Scheme च्या अधिकृत वेबसाइटवर जा -यावरील फार्मर कॉर्नरवर जाऊन Edit Aadhar Details या पर्यायावर क्लिक करा (हे वाचा-ALERT! ग्राहकांना बँकेतून आलेला फोन असू शकतो मोठा फ्रॉड, अशाप्रकारे घ्या जाणून) -याठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. यानंतर एक कॅप्चा कोड टाकून अपडेटेड माहिती सबमिट करावी लागेल. -जर तुमचे केवळ नाव चुकीचे आहे म्हणजेच जर तुमचा अर्ज आणि आधारवरील नाव वेगवेगळे आहे तर ते तुम्ही ऑनलाइन ठीक करू शकता. -जर अन्य चूक असल्यास तर तुम्ही लेखापाल आणि कृषि विभाग कार्यालयात संपर्क करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: PM Kisan, Pm modi

    पुढील बातम्या