सध्याच्या काळात अशी अनेक लोन अॅप्स आली आहेत ज्यातून तुम्ही घर बसल्या काही स्टेप्समध्ये सहज कर्ज घेऊ शकता. परंतु काही वेळा त्यांचा वापर करणे तुमच्यासाठी चांगले नसते. याचेच कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. क्रेडिट कार्डने रेंट भरता? मग ही माहिती असायलाच हवी
तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवावे की, अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज करताना तुम्हाला तुमच्याबद्दल योग्य माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही तुमच्या पगाराची आणि कागदपत्रांची चुकीची माहिती दिली तर तुम्हाला कर्ज कमी आणि त्यावर व्याज जास्त दिले जाईल. फ्लाइटमध्ये प्रवास करताना करु नका ‘या’ चुका, अन्यथा…
अॅपच्या मदतीने कर्ज घेताना, नेहमी लक्षात ठेवा की, नेहमी मोठा EMI निवडा. जेणेकरून कर्ज लवकरात लवकर पूर्ण होईल आणि फक्त इमरजेंसी परिस्थितीत कमी EMI चा ऑप्शन निवडा.
आजकाल लोक छोट्या छोट्या गरजांसाठी अॅपच्या मदतीने कर्ज घेतात. परंतु यूझर्सने हे लक्षात ठेवलं पाहिजे की, ते आवश्यकतेनुसारच वापरावं. कारण ते बँकांकडून उपलब्ध असलेल्या कर्जापेक्षा बरंच वेगळंआहे. यामध्ये चार्ज देखील जास्त आकारले जाते. इतकेच नाही तर अनेक वेळा प्रोसेसिंग फी ईएमआयमध्येच जोडली जाते, अशा स्थितीत तुमच्यावर एकाच वेळी जास्त भार पडतो.
अॅपद्वारे कर्ज घेताना कधीही मोठी रक्कम निवडू नका. कारण ती रक्कम तुमच्या CIBIL स्कोअरशी जुळते परंतु त्यावर आकारले जाणारे व्याज इतके जास्त राहते की, तुम्हाला परतफेडीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. त्यामुळे तुमचे खूप नुकसान होते.
तुम्ही अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज करत असाल, तर तुम्ही आधी अटी आणि शर्ती वाचण्याचा प्रयत्न करा. कारण काही वेळा तुमच्या कर्जाच्या अर्जात अशा अटी आणि शर्ती समाविष्ट केल्या जातात, ज्यामुळे तुम्हाला नंतर खूप त्रास होऊ शकतो.