Home /News /national /

अखेर 25 मे रोजी आकाशात झेपावणार विमानं! सोमवारपासून होणार देशांतर्गत विमानसेवा सुरू

अखेर 25 मे रोजी आकाशात झेपावणार विमानं! सोमवारपासून होणार देशांतर्गत विमानसेवा सुरू

विमानसेवेसाठी बुकिंग देखील लवकरात लवकर सुरू करण्यात येईल मात्र त्याबाबत अद्याप कोणतीह अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे.

    नवी दिल्ली, 20 मे : नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी बुधवारी अशी माहिती दिली आहे की, देशामध्ये 25 मे म्हणजेच सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. पुरी यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे की सोमवारपासून देशांतर्गत विमानांचे उड्डाण सुरू केले जाईल. यासंदर्भात सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना उड्डाणासाठी आणि इतर व्यवस्थांसाठी तयार राहण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी मंत्रालयाकडू एसओपी देखील जारी करण्यात येणार आहे. सोमवार पासून सुरू होणाऱ्या विमानसेवेसाठी बुकिंग देखील लवकरात लवकर सुरू करण्यात येईल मात्र त्याबाबत अद्याप कोणतीह अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे. गेल्या 2 महिन्यांपासून विमानसेवा पूर्णपणे ठप्प आहे. परदेशात जाणारी विमानं त्याचबरोबर देशांतर्गत विमानांनी देखील लॉकडाऊनच्या या काळात आकाशात भरारी घेतलेली नाही. या दरम्यान सरकारच्या वंदे भारत मिशनअंतर्गत परदेशामध्ये फसलेल्या भारतीयांना देशात परत आणण्याचे काम सुरू होते. या कालावधीमध्ये विमान कंपन्यांना आणि एकंदरित एव्हिएशन सेक्टरला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू होत असल्याने विमान कंपन्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना विविध नियमांचे पालन करत या सेवेचा फायदा घेता येणार आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Civil Aviation Minister Hardeep Singh Puri) यांनी काल माहिती दिली होती की, नागरी उड्डाण मंत्रालय, विमानतळ संचालक आणि विमानकंपन्या पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्यासाठी तयार आहेत. हे सर्वजण केंद्र आणि राज्य सरकारांकडून हिरवा कंदिल मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. पुरी यांनी ट्विटरवरून अशी माहिती दिली होती की, देशांतर्गत उड्डाणं पुन्हा सुरू करण्यासाठी केवळ @MoCA_GoI नागरी उड्डाण मंत्रालय किंवा केंद्र सरकार निर्णय घेत नाही. याकरता राज्य सरकारांची देखील मंजूरी मिळणे आवश्यक आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या