मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घर घेण्यासाठी Home Loan घेताय? करसवलत मिळण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

घर घेण्यासाठी Home Loan घेताय? करसवलत मिळण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

होम लोन घेऊन घर खरेदी करणाऱ्या किंवा घर बांधू इच्छिणाऱ्यांनी करसवलतीचा लाभ मिळावा यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

होम लोन घेऊन घर खरेदी करणाऱ्या किंवा घर बांधू इच्छिणाऱ्यांनी करसवलतीचा लाभ मिळावा यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

होम लोन घेऊन घर खरेदी करणाऱ्या किंवा घर बांधू इच्छिणाऱ्यांनी करसवलतीचा लाभ मिळावा यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

मुंबई, 04 ऑक्टोबर : स्वतःच्या मालकीचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण परिश्रम करून पैसे जमवत असतो. आजकाल मोठ्या शहरांमध्ये घर घेणं हे तसं सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात राहिलेलं नाही. अर्थात घरांच्या किंमती हे त्यासाठी महत्त्वाचं कारण आहे. परंतु, तरीदेखील काही जण होम लोनच्या (Home Loan) मदतीने शहरात त्यांच्या स्वप्नातलं घरकुल खरेदी करतात.

सध्याच्या काळात होम लोन हा गृह खरेदीसाठी एक महत्त्वाचा पर्याय मानला जातो. गेल्या काही वर्षांत होम लोनचा व्याज दर (Interest Rate) लक्षणीय कमी झाल्यानं बहुतांश जण गृहखरेदीसाठी होम लोन घेण्यास प्राधान्य देत आहेत. बॅंकादेखील ग्राहकांची गरज ओळखून होम लोन अगदी सहजपणे उपलब्ध करून देत आहेत. होम लोनच्या 'ईएमआय'वर (EMI) मोठी करसवलत मिळते; मात्र ही सवलत मिळवण्यासाठी घर खरेदी केलेल्या ग्राहकाने काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे. 'ईएमआय'वर करसवलत केव्हा मिळते, त्यासाठी काय करावं लागतं आणि काय टाळावं लागतं याविषयीची माहिती 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिली आहे.

'हा बोल दे तू' म्हणणाऱ्या उमेशच्या कानात श्रुतीने केला जोराचा 'हा'.., पाहा VIDEO

होम लोनच्या 'ईएमआय'चं व्याज आणि मुद्दल (Principal Amount) असे दोन भाग असतात. आयकर विभाग या दोन्ही भागांवर वेगवेगळ्या पद्धतीनं करसवलत (Tax) देतो. कलम 24 नुसार व्याजावर करसवलत मिळतं, तर कलम 80 सीनुसार मुदलावर करसवलत दिली जाते. एका आर्थिक वर्षात कलम 24 नुसार कमाल 2 लाखांपर्यंत करकपातीचा लाभ मिळू शकतो. 80 सी अंतर्गत करसवलतीची मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. याचाच अर्थ दोन्ही मिळून संबंधित ग्राहकाला 3.5 लाखांचा करकपातीचा लाभ मिळू शकतो.

होम लोन हे केवळ घर खरेदीसाठीच नाही, तर घर बांधणीसाठीही दिलं जातं. घर बांधणीसाठीदेखील करसवलत दिली जाते; मात्र त्यासाठीच्या अटी, नियम वेगळे आहेत. घरबांधणी 5 वर्षांत पूर्ण झाली, तरच करसवलत मिळू शकते. समजा तुम्हाला घर बांधणीसाठी 4 वर्षं लागली आणि या कालावधीत दरमहा तुम्ही ईएमआय भरला, तसंच व्याजापोटी एकूण 4 लाख रुपये जमा केले, तर पुढील पाच वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी 80 हजार रुपये करकपातीचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. हा लाभ कलम 24 बी नुसार दिला जातो; मात्र त्यासाठी 2 लाखांपर्यंतच मर्यादा आहे.

एखादी व्यक्ती स्वतःच्या नावावर दोन घरं राहण्यासाठी ठेवू शकते. परंतु, त्या व्यक्तीने दोन घरं असताना तिसरं घर खरेदी केलं, तर ते रेंट आउट (Rent Out) मानलं जातं. तिसऱ्या घराचा हिशेब चालू मार्केट दरानुसार केला जातो आणि संबंधित व्यक्तीस सर्व कर भरावा लागतो.

तेजस्विनीच्या मूडने लावलं याड ; Photos पाहून स्वप्नील जोशी म्हणाला...

तुम्ही घरखरेदी करत असाल तर जोपर्यंत ताबा मिळणार नाही किंवा घर बांधत असाल पण जोपर्यंत बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत कर्जाच्या परतफेडीवर करसवलत घेता येणार नाही. ताबा मिळाल्यानंतर किंवा घर बांधून पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला करसवलतीचा लाभ घेता येईल. घर बांधणी पूर्ण झाल्यानंतर जो 'ईएमआय' तुम्ही भराल, त्यावर मुद्दल परतफेडीअंतर्गत 80 सी नुसार आणि व्याज परताव्यावर 24 बी नुसार करकपातीचा लाभ मिळू शकतो. कन्स्ट्रक्शन कालावधीदरम्यान किंवा ताबा मिळेपर्यंत तुम्ही जितका 'ईएमआय' जमा केला आहे. त्यापैकी केवळ व्याजाचा जो भाग असेल, त्यावर करकपातीचा लाभ नंतर मिळतो. या कालावधीत जेवढी मुख्य रक्कम जमा केली आहे त्यावरील करसवलत ही नंतर दिली जात नाही.

Beauty In Black! अमृता खानविलकरचे स्किनफीट ब्लॅक ड्रेसमधील Photo Viral...

नियमानुसार, तुम्ही होम लोन घेऊन घर खरेदी केलं असेल आणि 5 वर्षांच्या आत त्याची विक्री (Sell) केली किंवा त्याचं हस्तांतरण केलं तर कलम 80 सी म्हणजेच मुख्य रकमेच्या परताव्यावर जेवढी करसवलत तुम्ही घेतली आहे ती परत घेतली जाते. ज्या आर्थिक वर्षात तुम्ही घराची विक्री करता, त्या वर्षातली करसवलत हे तुमचं उत्पन्न दर्शवलं जातं. या एकूण रकमेवर तुम्हाला नियमानुसार कर भरावा लागतो; मात्र कलम 24 बीनुसार घेतलेला करसवलतीचा लाभ परत घेतला जात नाही.

होम लोन घेऊन घर खरेदी करणाऱ्या किंवा घर बांधू इच्छिणाऱ्यांनी करसवलतीचा लाभ मिळावा यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Home Loan