जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'हा बोल दे तू' म्हणणाऱ्या उमेशच्या कानात श्रुतीने केला जोराचा 'हा'..; दोघांचा मजेशीर VIDEO होतोय व्हायरल

'हा बोल दे तू' म्हणणाऱ्या उमेशच्या कानात श्रुतीने केला जोराचा 'हा'..; दोघांचा मजेशीर VIDEO होतोय व्हायरल

'हा बोल दे तू' म्हणणाऱ्या उमेशच्या कानात श्रुतीने केला जोराचा 'हा'..;  दोघांचा मजेशीर VIDEO होतोय व्हायरल

मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेने (Shruti Marathe) देखील अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) याच्यासोबतचे एक भन्नाट आणि तितकच मजेशीर असं एक इन्स्टा रील शेअर केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 ऑक्टोबर ; सध्या सोशल मीडियावर  रीलचे  (Instagram Reel) वारे  जोरात वाहत आहे. यामध्ये आपले मराठी कलाकार देखील मागे नाहीत. काही कलाकार मंडळी दररोज इन्स्टावर रीलचे व्हिडिओ शेअर करत असतात. मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेने  (Shruti Marathe)  देखील अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) याच्यासोबतचे एक भन्नाट आणि तितकच मजेशीर असं एक इन्स्टा रील शेअर केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. श्रुतीने तिच्या अधिकृत इन्स्टावर एक रीलचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा जवळचा मित्र अभिनेता उमेश कामत देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उमेश अगदी फिल्मी स्टाईल रोमॅंटिक अंदाजात गाणे म्हणत आहे. हा बोल दे तू..असं गाणं उमेश म्हणताना दिसत आहे. यावर श्रुती मराठे मध्येच येते आणि उमेशच्या कानात जोरात हा…म्हणून ओरडते. हा म्हणायला सांगितले आणि भॉ..ओरडली ..अशा काहीशा मजेशीर चाहत्यांच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव सुरूच आहे. काहींनी या मजेशीर व्हिडिओला क्यूट व्हिडिओ असल्याचे देखील म्हटले आहे. वाचा : वीणाने हटवला शिवच्या नावाचा टॅटू ; खरंच दोघांचा झालाय का BREAK-UP? नेटकऱ्यांसोबत या व्हिडिओवर काही कलाकार मंडळींनी देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित यांनी हसण्याची इमोजी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. हे मजेशीर रील पाहिल्यावर हासू आवरत नाही. तसेच उमेश कामत व श्रुतीची जोडी देखील चाहत्यांना आवडत आहे.

जाहिरात

श्रुती मराठेने ‘सनई-चौघडे’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण केलं. तिची या चित्रपटातील छोटीशी भूमिका देखील चाहत्यांच्या लक्षात राहिली. यानंतर श्रुती अनेक मराठी चित्रपटात झळकू लागली. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ या मधून तिला खरी ओळख मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात