मुंबई, 4 ऑक्टोबर ; मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit )सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सोशल मीडियवर तेजस्विनीचे काही फोटो (Tejaswini Pandit Latest Photos )जोरदार व्हायरल होत आहेच. या फोटोमध्ये तिचे विविध मूड दिसत आहेत. चाहते तिच्या या फोटोंच्या प्रेमातच पडले आहे. तिच्या यो फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरूच आहे. तिचे हो फोटो पाहून मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीला देखील राहवले नाही त्यांने देखील कमेंट करत तिच्या या फोटोला दाद दिली आहे.
तेजस्विनीने तिच्या इन्स्टावर विविध फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचे विविध मूड दिसत आहेत. विशेष म्हणजे या मू़डसोबत तेजस्विनीच्या एक्सप्रेशन देखील पाहण्यास मिळत आहेत. हे फोटो शेअर करत तेजस्विनीने म्हटले आहे की, हे माझे मूड! आज तुमचा मूड कसा आहे ?, आता तेजस्विनीने असे विचारताच चाहत्यांनी देखील मनावर घेत कमेंटचा पाऊसच सुरू केला.
चाहते तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिच्या या एक्सप्रेशनचे कौतुक करत आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीने देखील कमेंट करत इमोजीझ..असे म्हटले आहे. खरंच हे फोटो पाहिल्यानंतर विविध एक्सप्रेशनमधी इमोजीझ डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. आतापर्यंत या फोटोवर 22 हजाराच्या घऱात लाईक्स आल्या आहेत.
View this post on Instagram
गेल्या एक दशकापासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात सिंधुताईंची भूमिका साकारणाऱ्या तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. उत्तम अभिनेत्रीबरोबरच डिझाइनर आणि चित्रकार म्हणूनही ती ओळखली जाते. रंगभूमीवरल्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची ती मुलगी. पण आईच्या पुण्याईवर या क्षेत्रात येण्यापेक्षा ती स्वत: या क्षेत्रात संघर्ष करत आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tejaswini pandit