मुंबई : घरात किराणा सामान आणायचं असेल तर हल्ली दुकानापेक्षा डी-मार्टला (DMart) प्राधान्य दिलं जातं. त्याचं कारण म्हणजे डी-मार्टमध्ये सामानावर मिळणारं डिस्काउंट. आता आपल्याला डिस्काउंट देणाऱ्या या कंपनीला नफा होत असेल की नसेल असा विचारही बऱ्याचदा आपल्या मनात येतो, पण नफा मिळत नसेल तर कोणतीही कंपनी डिस्काउंट देणार नाही, हेही तितकंच खरं. याच नफ्याची पुष्टी करणारी ही बातमी आहे. रिटेल चेन डी-मार्टचे सीईओ नेविल नोरोन्हा (Navil Noronha) यांनी मुंबईत एक आलिशान घर खरेदी केलंय. त्यांनी एका अंडर कन्स्ट्रक्शन रियल इस्टेट प्रोजेक्टमध्ये दोन युनिट बूक केली आहेत. यासाठी त्यांनी तब्बल 70 कोटी रुपये मोजले आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीच नोरोन्हा यांच्या नावाचा बिलेनियर्स क्लबमध्ये समावेश झाला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत सीईओंमध्ये गणले जाणारे नेविल नोरोन्हा यांनी मुंबईत घर घेतलं आहे. ही प्रॉपर्टी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये खरेदी केली आहे. येथे त्यांनी रुस्तमजी सीझन्स (Rustomjee Seasons) या अंडर कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये 66 कोटी रुपयांना दोन युनिट्स बुक केली आहेत. यासाठी नोरोन्हा यांना तब्बल 3.30 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागली आहे. हे वाचा-Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम 10 कारसाठी पार्किंगची जागा बिझनेस हबजवळ असलेली ही प्रॉपर्टी डील रिअल इस्टेटमधील सर्वांत मोठ्या डील्सपैकी एक आहे. रिपोर्टमध्ये झॅपकीवरील (Zapkey) रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्सचा संदर्भ देत, दोन्ही युनिटचे एकूण रेरा कार्पेट एरिया 8,640 चौरस फूट, डेक आणि टेरेस एरिया 912 चौरस फूट असून नोरोन्हा यांनी खरेदी केलेल्या या एकूण प्रॉपर्टीचे संपूर्ण क्षेत्रफळ 9,552 चौरस फूट असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे नोरोन्हा यांना 10 कारसाठी पार्किंगची जागा देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रोजेक्टचे डेव्हलपर तसंच सीईओ नोरोन्हा यांच्यापैकी कोणीही याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. हे वाचा-डेबिट-क्रेडिट कार्डचे 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम, तुमच्यावर होणार थेट परिणाम ऑक्टोबर 2021 मध्ये बनले अब्जाधीश डी-मार्ट रिटेल स्टोअर चालवणारी कंपनी अॅव्हेन्यु सुपरमार्ट्स लिमिटेडचे (Avenue Supermarts Ltd) सीईओ (CEO) इग्नाटियस नेविल नोरोन्हा ऑक्टोबर 2021 मध्ये अब्जाधीश सीईओच्या क्लबमध्ये सामील झाले होते. BSE वर कंपनीच्या स्टॉकने इंट्राडेमध्ये 5,899 रुपयांचा नवीन रेकॉर्ड बनवल्यानंतर त्याच्या मार्केट कॅपने 3.54 लाख कोटी रुपयांची लेव्हल पार केली होती, त्यानंतर त्यांचा बिलेनियर्स क्लबमध्ये समावेश झाला होता. त्याचबरोबर नोरोन्हा यांची संपत्ती 7,744 कोटी रुपयांवर पोहोचली होती. नोरोन्हा यांच्याजवळ Avenue Supermarts चे 2 टक्के स्टेक आहेत. हे वाचा-होम लोन फेडल्यानंतर न विसरता करा ‘या’ गोष्टी, नाहीतर येऊ शकतात अडचणी डी-मार्ट स्टोअर्सची संख्या वाढवणार कंपनीचे सीईओ नेव्हिल नोरोन्हा यांनी अलीकडेच सांगितलं होतं, की डी-मार्ट आपल्या स्टोअरची संख्या 1,500 पर्यंत वाढवू शकते. डी-मार्ट भारतीय अब्जाधीश राधाकृष्ण दमानी (Radhakishan Damani) यांची रिटेल चेन Avenue Supermarts Ltd अंतर्गत चालवली जाते. सध्या त्यांची देशभरात 284 स्टोअर्स असून, ती पाच पटीने वाढवण्याची तयारी कंपनीने केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.