जाहिरात
मराठी बातम्या / मनी / मुहूर्त ट्रेडिंग 2022 : 'या' शेअर्समध्ये पैसे गुंतवा आणि बंपर रिटर्न्स मिळवा

मुहूर्त ट्रेडिंग 2022 : 'या' शेअर्समध्ये पैसे गुंतवा आणि बंपर रिटर्न्स मिळवा

मुहूर्त ट्रेडिंग 2022 : 'या' शेअर्समध्ये पैसे गुंतवा आणि बंपर रिटर्न्स मिळवा

दिवाळीत ‘पोर्टफोलिओ’लही करा प्रकाशमय, ‘या’ शेअर्समध्ये पैसे गुंतवा आणि बंपर रिटर्न्स मिळवा

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : देशभरात आज दिवाळीचा उत्साह आहे. आज लक्ष्मीपूजनादिवशी मुहूर्त ट्रेडिंग केलं जातं. शेअर बाजार संध्याकाळी एक तासासाठी उघडणार आहे. या एक तासात तुम्ही योग्य निर्णय घेऊन गुंतवणूक केली तर तुमची आर्थिक भरभराट होते असं म्हटलं जातं. खरंतर दिवाळीत सर्व प्रकारच्या गुंतवणुकीला सुरुवात करणं शुभ मानलं जातं. त्याचबरोबर संवत 2079 मध्ये भारतीय बाजार अधिक चांगली कामगिरी होईल, असे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 24 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी एनएसई आणि बीएसईवर मुहूर्त ट्रेडिंगसाठी गुंतवणूकदार आतुरतेनं वाट पाहात आहेत. कोटक सिक्युरिटीज भारतीय इक्विटी बाजारात तेजीत आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये निफ्टीच्या निव्वळ नफ्यात 9.9 ने वाढ करणे शक्य असल्याचे या ब्रोकरेज हाऊसने म्हटले आहे. या काळात ऑटो, आयटी आणि फायनान्शिअलसह अनेक क्षेत्रात वाढ झालेली दिसेल. कोटक सिक्युरिटी व्यतिरिक्त जेएम फायनान्शिअल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीने चांगल्या रिटर्न्स देत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोटक सिक्युरिटीने एजिस लॉजिस्टिक्सच्या शेअरमध्ये 330 रुपयांचे टार्गेट दिलं आहे. पुढच्या एका वर्षात 20 टक्क्यांनी तेजी मिळू शकते. ब्रोकरेज हाऊसने सिप्ला या दिग्गज फार्मा कंपनीच्या शेअरवर बायबद्दल ओपिनियन दिलं आहे. एका वर्षाच्या कालावधीत 1215 रुपयांचे लक्ष्य गाठू शकते असंही त्यांनी म्हटलं आहे. कोटक सिक्युरिटीने रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी डीएलएफच्या शेअरवर खरेदीचा कौल दिला असून सध्याच्या किंमतीपेक्षा 14.3 टक्क्यांनी उसळी घेत 410 रुपये लक्ष्य किंमत दिली आहे.

मुहूर्त ट्रेडिंग 2022: 1 तासात पैसे Invest करतान करू नका ‘या’ चुका, मिळेल ‘तगडा रिटर्न’

देशातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे समभाग पुढील एका वर्षात 1750 रुपयांचे लक्ष्य गाठू शकतात. सध्याच्या किंमतीवरून तो 18.7 टक्के रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. कोटक सिक्युरिटीनेही केमिकल स्टॉक एसआरएफवर खरेदीचा कौल दिला आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा 13.4 टक्के परतावा मिळून हा शेअर 2830 चे लक्ष्य गाठू शकतो. JM Financial Top Picks दिग्गज ब्रोकरेज हाउस जेएम फाइनान्शियलने केपीआईटी टेक्नोलॉजीच्या स्टॉकला 830 रुपयांचं टार्गेट दिलं आहे. Schaeffler India Ltd च्या स्टॉकमध्ये 27 टक्के वाढ होऊन तो 4045 पर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पराज इंडस्ट्रीच्या शेअर्समध्ये 27 टक्क्यांनी वाढ होईल. तर चोलामंडल इंन्वेस्टमेंट आणि फायनान्सचा शेअर 950 पर्यंत जाईल असा दावा केला आहे. केमिकल स्टॉक दीपक नाइट्रेट येत्या एका वर्षात 2730 पर्यंत पोहोचेल त्यामुळे तुम्ही इथेही पैसे लावू शकता असं सांगितलं आहे.

सणासुदीला Loans ऑफरचा फायदा घ्यावा का? तुमचे खरंच पैसे वाचतात की….

ICICI Securities Top Picks देशातील टायर तयार करणारी महाकाय कंपनी अपोलो टायर्सच्या शेअरवर ब्रोकरेज हाऊसने पुढील एक वर्षासाठी 335 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. आयशर मोटर्सने या शेअरवर 4170 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. आयटी कंपनी कोफोर्जचा शेअर 22 टक्क्यांच्या तेजीने पुढील एका वर्षात 4375 रुपयांचे लक्ष्य गाठू शकतो.

News18लोकमत
News18लोकमत

ब्रोकरेज हाऊसने हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्रायझेसवर 345 रुपये, कॉन्कोर इंडियावर 890, हॅवेल्स इंडियावर 1650 आणि लेमन ट्री हॉटेलच्या शेअरवर 110 रुपयांचे लक्ष्य दिले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात