जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Dhanteras 2022 : ज्वेलर्सकडून सोन्यावर बेस्ट ऑफर, कुठे करू शकता खरेदी पाहा

Dhanteras 2022 : ज्वेलर्सकडून सोन्यावर बेस्ट ऑफर, कुठे करू शकता खरेदी पाहा

Dhanteras 2022 : ज्वेलर्सकडून सोन्यावर बेस्ट ऑफर, कुठे करू शकता खरेदी पाहा

तुम्ही जर सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : सणावार म्हणजे शुभ मुहूर्त आपल्याकडे सणासुदीला सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते. कधी दागिने तर कधी भविष्यातील गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं.धनत्रयोदशी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. जो यावर्षी 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे.  दिवाळीच्या दोन दिवस आधी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सोने, चांदी किंवा मौल्यवान धातू खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला देशभरातील ज्वेलर्स सोनं आणि चांदीवर भरघोस सूट देतात. यादिवशी सोन्याची उलाढालही मोठी असते. त्यामुळे सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या विक्रीत वर्षानुवर्ष वाढ होत आहे. यंदाही देशातील बडे ज्वेलर्स सोन्यावर भरघोस सूट देत आहेत. तुम्ही जर सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण धनत्रयोदशीला तुम्हाला कुठे कुठे ऑफर्स मिळू शकतात याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

धनत्रयोदशीला डिजिटल गोल्ड खरेदी करणं फायद्याचं की तोट्याचं?

तनिष्क सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर टाटा समूहाच्या मालकीची तनिष्क 20 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. इतकंच नाही तर तनिष्कच्या गोल्ड, पोलकी, कुंदन पोलकी, ग्लास कुंदन आणि कलर स्टोन ज्वेलरीवर ग्राहकांना 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. ही ऑफर केवळ ऑनलाइन पोर्टल tanishq.co.in आणि तनिष्क अॅपवर उपलब्ध आहे. ही ऑफर 26 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असणार आहे. पीजी ज्वेलर्स पीसी ज्वेलर हिरे, सोने-चांदीचे दागिने आणि इतर वस्तूंच्या मेकिंग चार्जेसवर 25 टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत. ग्राहकांना जुन्या सोन्याच्या वजनावर शून्य टक्के वजावट घेऊन नाणे तयार करण्यावरही 10 टक्के सूट देत आहेत. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड, एचएसबीसी बँक क्रेडिट कार्ड आणि कोटक बँक डेबिट कार्डचे वापरकर्ते 5 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. तसेच किमान 250,000 ते 1,00,000 रुपयांच्या खरेदीवर 2500-5000 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक दिला जात आहे. ही ऑफर 26 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असणार आहे.

24, 22, 18 की 14 दिवाळीमध्ये कोणतं सोनं खरेदी करावं? तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

जोयालुक्कास यांनी धनत्रयोदशीनिमित्ताने खास कॅशबॅकची ऑफर दिली आहे. 50 हजार रुपयांच्या खरेदीवर त्यांनी 2 हजार रुपयांपर्यंतचे वाउचर देणार असल्याचं सांगितलं आहे. 10 हजार रुपयांच्या खरेदीवर ५०० रुपयांचं गिफ्ट वाउचर मिळणार आहे. ही ऑफर 24 ऑक्टोबरपर्यंत वैध असणार आहे.

सेनको यांनी डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर 100 टक्के सूट दिली आहे. चांदीच्या वस्तूंवर 15 टक्क्यांपर्यंत सूट असणार आहे. प्लॅटिनमवर 25 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येणार आहे. ही ऑफर 1 नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

वाढत्या महागाईमध्ये सोन्यात किती गुंतवणूक करावी? तज्ज्ञ काय म्हणतात वाचा
News18लोकमत
News18लोकमत

पीसी चंद्रा ज्वेलर्स पीसी चंद्र ज्वेलर्सने सर्व दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 25 टक्क्यांपर्यंत सूट आणि हिरे आणि ज्योतिषीय दगडांच्या किंमतीवर 12 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय ज्वेलर सोन्याच्या दागिन्यांच्या प्रति ग्रॅम 125 रुपयांची सूट देत आहे. ही ऑफर केवळ ऑनलाइन उपलब्ध असून 23 ऑक्टोबरपर्यंत याचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात