जाहिरात
मराठी बातम्या / मनी / वाढत्या महागाईमध्ये सोन्यात किती गुंतवणूक करावी? तज्ज्ञ काय म्हणतात वाचा

वाढत्या महागाईमध्ये सोन्यात किती गुंतवणूक करावी? तज्ज्ञ काय म्हणतात वाचा

पेपर गोल्ड म्हणजे काय रे भाऊ? यामध्ये पैसे गुंतवणं खरंच फायद्याचं आहे का?

पेपर गोल्ड म्हणजे काय रे भाऊ? यामध्ये पैसे गुंतवणं खरंच फायद्याचं आहे का?

देशात सणासुदीच्या काळात मागणी वाढली आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहिली की नाही यावर तज्ज्ञांनी आपलं मत दिलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : गेल्या महिन्यापर्यंत ५० हजारांच्या खाली उतरलेल्या सोन्याचे दर सतत बदलत आहेत. डॉलरचं मूल्य वाढल्याने सोन्यावर परिणाम होत आहे. देशात सणासुदीच्या काळात मागणी वाढली आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहिली की नाही यावर तज्ज्ञांनी आपलं मत दिलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर सोन्याचा स्पॉट रेट सध्या प्रति औंस 1,700 डॉलरच्या आसपास आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्यावरील दबाव पाहून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवली आहे. कमोडिटी तज्ज्ञ आणि केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार जागतिक आणि देशांतर्गत बाजारात असे अनेक घटक आहेत, जे सोन्यात गुंतवणुकीचे संकेत देत आहेत. डॉलरच्या तुलने रुपया कमजोर होत आहे, त्याचवेळी सोन्याचं मूल्य वाढत आहे. विदेशी गुंतवणूकदारांना सध्या इक्विटी आणि फॉरेक्समध्ये गुंतवणूक करणे धोक्याचं वाटत आहे. भारतीय रुपयाच नाही तर युरो, पाउंडसह आशियातील सर्व चलने डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत, जोखीम लक्षात घेऊन परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा सुरक्षेच्या अनुषंगाने सोन्यात पैसे गुंतवायला सुरुवात केली आहे. सणासुदीच्या काळात वाढती मागणी ऑक्टोबर महिना हा सणासुदीचा काळ आहे. या कालावधीमध्ये सर्वात जास्त सण असल्याने सोन्याची मागणी वाढणारी आहे. धनत्रयोदशी, दिवाळीमध्ये सोन्याला चांगली चकाकी येते. अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार वायदा बाजारात सोन्याच्या किंमती ५३ हजार रुपये तोळ्यावर जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत ५३ हजारापर्यंत सोनं राहील असा त्यांचा दावा आहे.

तुमच्याकडेही Hallmark नसलेले सोन्याचे दागिने आहेत का? आता काय करायचं?

फेडरल बँकेनं पुन्हा व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत होणारी व्याजदरातील ही वाढ चिंताजनक आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय आणि आशियातील बाजारपेठेवर झाला आहे. इक्विटीमधील गुंतवणुकीत मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अशावेळी गुंतवणूकदार सोन्याकडे वळण्याची शक्यता आहे. जगतिक मंदीचे संकेत एकीकडे मिळत असताना सोन्यात गुंतवणूक करणं काहीसं फायद्याचं देखील राहण्याची शक्यता आहे. २००८ च्या वेळी आलेल्या मंदीबाबत विचार करता त्यावेळी देखील सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या. ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली होती त्यांना मोठा फायदा मिळाला. जेव्हा जगभरात शेअर बाजार कोसळला होता तेव्हा सोन्याचे दर गगनाला भिडले होते. जेव्हा महागाई उच्चांकावर पोहोचते तेव्हा सोन्याचा सपोर्ट मिळतो. रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसला आहे. आधी कोरोना आणि नंतर युद्ध यामुळे मोठं नुकसान झालं. सोनं एकेकाळी ५६ हजारहून अधिक पोहोचलं होतं. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार महागाईच्या काळात सोन्यात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Gold Price Today: डॉलरचा सोन्यावर दबाव, ऐन दिवाळीत सोनं होणार स्वस्त?
News18लोकमत
News18लोकमत

गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये किती सोने ठेवावे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्याची परिस्थिती पाहिल्यास सोन्याची मागणी वाढत असल्याचे दिसते. सध्या पोर्टफोलियोमध्ये तुम्ही किती सोनं ठेवावं या दृष्टीने विचार करायचा झाल्यास २० टक्के सोन्यात गुंतवणूक करावी असं म्हणतात. सध्याच्या घसरणीनंतरही इक्विटी मार्केटमधून मोठा परतावा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात