मुंबई : धनत्रयोदशी आणि सोनं खरेदी हे एक जणू समीकरणच आहे. धनत्रयोदशीपासून सोनं खरेदीला बहार येतो. मात्र कोरोनामुळे बऱ्याच गोष्टी ऑनलाइन घेण्यावर भर देण्यात आला आहे. आता सोनं खरेदीपेक्षा काही जणांचा कल हा डिजिटल सोनं खरेदीकडे वळला आहे. यंदाच्या धनत्रयोदशीला तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा तसा काही विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड खूप पूर्वीपासूनच आहे, मात्र आता त्याची पद्धत बदलत चालली आहे. पूर्वी सोनं हे स्त्रीधन म्हणून पाहिलं जात होतं. नंतर गुंतवणूक म्हणून आणि आता सोन्याचं नाणं घेण्यापेक्षा डिजिटल गोल्ड घेण्याचा पर्याय निवडला जातो. हा भारतातील गुंतवणुकीचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे.
फिजिकल गोल्डशिवाय गुंतवणुकीचे इतर पर्यायही यात आहेत. गेल्या काही वर्षांत डिजिटल क्रांतीच्या तेजीने सोन्याची बाजारपेठही विस्तारली आहे. गुंतवणूकदार आता डिजिटल सोन्यातही गुंतवणूक करू लागले आहेत. जर तुमचा ज्वेलर तुम्हाला या सणासुदीच्या हंगामात फिजिकलऐवजी ऑनलाईन सोनं खरेदी करण्याची ऑफर देत असेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका, डिजिटल सोनं खरेदी करण्यापूर्वी फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा.
दिवाळीला सोनं खरेदी करताय? मग ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही फसवणूक
आतापर्यंत देशातील एमएमटीसी-पॅम्प, ऑगमाँट आणि सेफगोल्ड या सरकारमान्य गोल्ड रिफायनर कंपन्याच वित्तीय सेवा पुरवठादार आणि ज्वेलरी ब्रँडच्या शेअर्समध्येही सेवा पुरवत होत्या. पण आता काही ज्वेलर्सनी डिजिटल गोल्डचे आपले प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत.
सोन्याची डिलिव्हरी घेऊ शकता
या प्लॅटफॉर्म्समध्ये थर्ड पार्टीला तुमच्या गुंतवणुकीचा ताबा असतो. तुमच्या तिजोरीमध्ये सोनं साठवून ठेवता येईलच असं नाही. जर तुम्ही एमएमटीसी-पॅम्प, ऑगमाँट आणि सेफगोल्डमधून डिजिटल सोन्यात गुंतवणूक केली तर ते तुमचं सोनं डिजिटल तिजोरीमध्ये ठेवता येतं, तुम्हाला त्याची फी तुम्ही ते फिजिकल देखील करून घेऊ शकता.
ज्वेलर्सच्या फ्लॅटफॉर्मवरून हे सोनं घेताना याबाबत निश्चित माहिती मिळत नाही. ते खरंच सोनं खरेदी केलं आहे की एका वॉल्टमध्ये स्टोर केलं आहे याबाबत काहीवेळा संभ्रम निर्माण होतो. याशिवाय सराफांकडे सुरू असलेली स्कीम आता डिजिटल स्वरुपात आणण्याचा विचार सुरू आहे. थोडे थोडे पैसे भरून एकदम सोनं घेता येऊ शकतं. थोडक्यात SIP सारखी सिस्टिम आणण्याचा विचार सुरू आहे.
24, 22, 18 की 14 दिवाळीमध्ये कोणतं सोनं खरेदी करावं? तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?
ज्वेलर्सचं काय मत
डिजिटल खरेदी केलेलं सोनं नंतर तुम्ही दागिन्यांसाठी रिडेम करू शकता का? सराफांच्या म्हणण्यानुसार डिजिटल गोल्डमध्ये गुंतवलेले पैसे हे परदेशात वॉल्ट्समध्ये ठेवले जातात. त्यामुळे आयात शुल्काची बचत होते. मात्र हे तुम्हाला रिडेम करून हवं असेल तर काय असाही यानंतर एक प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
या गोष्टी पाळा
सोन्याचे दागिने खरेदी करणं हे तुमचं ध्येय असेल तर तुम्ही एकतर पैसे जमा करणं किंवा त्यात गुंतवणूक करण्यासाठी सुरक्षित योजना निवडणंच योग्य ठरेल. सेबीने ऑगस्ट 2021 मध्ये शेअर दलालांना डिजिटल सोने वितरण करण्यास मनाई केली होती. सोनेखरेदी सध्या कोणत्याही नियमात येत नाही. डिजिटल सोने हे देशातील क्रिप्टोकरन्सीसारखे आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी 10 वेळा विचार करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dhanteras, Gold and silver, Gold bond, Gold price, Sovereign gold bond scheme