मराठी बातम्या /बातम्या /मनी /Dhanteras 2021: सोनंच नव्हे डायमंड आणि चांदीच्या दागिन्यांवरही सूट, मिळेल भन्नाट डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स

Dhanteras 2021: सोनंच नव्हे डायमंड आणि चांदीच्या दागिन्यांवरही सूट, मिळेल भन्नाट डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स

Dhanteras 2021:  तुम्ही देखील आज सोनेखरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी स्वस्तात सोने खरेदी करता येईल. धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर ज्वेलर्स ऑफर देत आहेत.

Dhanteras 2021: तुम्ही देखील आज सोनेखरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी स्वस्तात सोने खरेदी करता येईल. धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर ज्वेलर्स ऑफर देत आहेत.

Dhanteras 2021: तुम्ही देखील आज सोनेखरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी स्वस्तात सोने खरेदी करता येईल. धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर ज्वेलर्स ऑफर देत आहेत.

ममुंबई, 02 नोव्हेंबर: दिवाळीच्या हंगामात (Diwali 2021) खासकरून धनत्रयोदशी दिवशी (Dhanteras 2021) सोन्याची खरेदी करण्याची भारतात परंपरा आहे. तुम्ही देखील आज सोनेखरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या तुम्हाला कोणत्या ठिकाणी स्वस्तात सोने खरेदी करता येईल. धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर ज्वेलर्स ऑफर देत आहेत. PC Jeweller आणि Tanishq सारखे दागिन्यांचे मोठे ब्रँड्स धनत्रयोदशी आणि दिवाळी 2021 च्या निमित्ताने सोने आणि हिऱ्यांच्या उत्पादनांवर कॅशबॅक आणि सूट देत आहेत. ज्वेलर्सनी लाँच केलेल्या ऑफरमध्ये कॅशबॅक, मेकिंग चार्जेसवर सूट इ. सवलती ग्राहकांना मिळत आहेत, त्यामुळे तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की यावेळीही सोन्याची मागणी वाढणार आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, जाणून घ्या काय आहेत ऑफर्स

पीसी ज्वेलर्स (PC Jewelers)

PC ज्वेलर्स डायमंड ज्वेलरी आणि सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळीच्या शुल्कावर (Gold Making Charges) 30% पर्यंत सूट देत आहे. तसेच चांदीचे दागिने आणि वस्तूंवर सूट दिली जाते. ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांना 50,000 रुपयांच्या किमान खर्चावर 7.5 टक्के कॅशबॅक मिळत आहे. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना कमाल 7,500 रुपये आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांना 5,000 रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळत आहे. ही ऑफर ग्राहकांसाठी 7 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध आहे.

हे वाचा-धनत्रयोदशीला खरेदी करताय सोनं? लक्षात ठेवा या 5 गोष्टी, अन्यथा होईल नुकसान

तनिष्क (Tanishq)

तनिष्क मेकिंग चार्जेसवर 20% सूट देत आहे. ही ऑफर सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर उपलब्ध आहे.

मलबार गोल्ड आणि डायमंड (Malabar Gold and Diamond)

दिवाळीनिमित्त मलबार गोल्ड अँड डायमंड्स 30,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या प्रत्येक खरेदीवर 1 मोफत सोन्याचे नाणे आणि 30,000 रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या प्रत्येक खरेदीवर 2 सोन्याची नाणी देत आहे. SBI क्रेडिट कार्ड युजर्सना याठिकाणी अतिरिक्त 5 टक्के कॅशबॅक मिळेल.

जॉयआलुकास (Joyalukkas)

Joyalukkas हिरे आणि 25 हजारांच्या किंमतीपर्यंत दागिने खरेदी केल्यानंतर 1000 रुपयांचे व्हाउचर देत आहे. ज्वेलरी फर्म 10000 रुपयांच्या चांदीच्या खरेदीवर 500 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देत आहे.

हे वाचा-सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरेल का? फिजिकल-डिजिटल Gold पैकी हा पर्याय Best

सेन्को गोल्ड आणि डायमंड्स (Senco Gold and Diamonds)

ही ज्वेलरी फर्म सोन्याच्या दागिन्यांवर 225 रुपये प्रति ग्रॅम (100 रुपयांची सूट+ 125 रुपये किंमतीची चांदी प्रति ग्रॅम) सवलत देत आहे. शिवाय डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जवर मोफत सोने आणि 75 टक्क्यांपर्यंत सूट मिळवता येईल. ही ऑफर स्टोअरमध्ये ठराविक कालावधीसाठी आहे.

First published:
top videos