मराठी बातम्या /बातम्या /मनी /Diwali 2021 Gold Investment: सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरेल का? फिजिकल-डिजिटल Gold पैकी हा पर्याय Best

Diwali 2021 Gold Investment: सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरेल का? फिजिकल-डिजिटल Gold पैकी हा पर्याय Best

गुंतवणुकीचा विचार केला तर सोन्याचा पर्याय कायम फायद्याचा ठरतो. कारण गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी सोन्याचा पर्याय हा सुरक्षित आणि सर्वात जास्त रिटर्न (परतावा) देणारा आहे. सोन्याच्या गुंतवणुकीतून (Gold Investment) नुकसान झालेली व्यक्ती मिळणं जवळपास अशक्यचं आहे.

गुंतवणुकीचा विचार केला तर सोन्याचा पर्याय कायम फायद्याचा ठरतो. कारण गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी सोन्याचा पर्याय हा सुरक्षित आणि सर्वात जास्त रिटर्न (परतावा) देणारा आहे. सोन्याच्या गुंतवणुकीतून (Gold Investment) नुकसान झालेली व्यक्ती मिळणं जवळपास अशक्यचं आहे.

गुंतवणुकीचा विचार केला तर सोन्याचा पर्याय कायम फायद्याचा ठरतो. कारण गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी सोन्याचा पर्याय हा सुरक्षित आणि सर्वात जास्त रिटर्न (परतावा) देणारा आहे. सोन्याच्या गुंतवणुकीतून (Gold Investment) नुकसान झालेली व्यक्ती मिळणं जवळपास अशक्यचं आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 02 नोव्हेंबर: दिवाळीचा (Diwali 2021) सण सुरू झाला असून आज देशभर धनत्रयोदशी (Dhanteras 2021) साजरी केली जात आहे. आपल्याकडे धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. विशेषत: धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की, या दिवशी सोनं (Buy Gold on Dhanteras ) खरेदी केल्यानं वर्षभर घरात आणि व्यवसायात समृद्धी मिळते. आपल्यावर धनाची देवी लक्ष्मी वर्षभर कृपा करते. धार्मिक श्रद्धा म्हणून आपल्यापैकी बहुतेक जण धनत्रयोदशीला सोनं खरेदी करतातच. मात्र, याव्यक्तिरिक्त गुंतवणुकीचा विचार केला तर सोन्याचा पर्याय कायम फायद्याचा ठरतो. कारण गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी सोन्याचा पर्याय हा सुरक्षित आणि सर्वात जास्त रिटर्न (परतावा) देणारा आहे. सोन्याच्या गुंतवणुकीतून (Gold Investment) नुकसान झालेली व्यक्ती मिळणं जवळपास अशक्यचं आहे.

    सोनं केवळ सुरक्षित गुंतवणुकीसाठीच नाही तर येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आपला वारसा पोहोचवण्यासाठीही खरेदी करून ठेवलं जातं. कुटुंबाचं वैभव आणि समृद्धी दर्शविण्यासाठीदेखील सोन्याचा वापर केला जातो. सोन्यातून आपल्याला चांगले रिटर्न मिळतात, हे तर निश्चित आहे. मात्र, नेमके किती रिर्टन्स (Returns) मिळतात? एका वर्षात आपल्याला किती फायदा होऊ शकतो किंवा होतो, या सर्व गोष्टींचा विचार आपण करतच नाही. मात्र, जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करत असाल तर एका वर्षात त्यातून आपल्याला किती फायदा होतो, याची नक्की दखल घेतली पाहिजे.

    हे वाचा-पेट्रोलच्या किंमतींनी बिघडवलं सामान्यांचं बजेट, आजही वधारले भाव

    10 वर्षांपूर्वी धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या सोन्यानं आतापर्यंत 6.56 टक्के वार्षिक परतावा दिल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. हे रिटर्न गेल्या दहा वर्षांतील सरासरी सीआयआयच्या इनफ्लेशन इंडेक्स (cost inflation index- CII) मध्ये झालेल्या 5.6 टक्के वार्षिक वाढीपेक्षा अधिक आहेत. सीआयआयच्या माहितीनुसार, सध्या महागाई (inflation) आणि सोन्याच्या किमती दोन्हीही खूप वाढल्या आहेत. तरीही सोन्यातून चांगले रिटर्न्स मिळत आहेत. गेल्या दशकभरात सोन्यानं महागाईवर मात केली असली तरी इतर पर्यायांच्या तुलनेत ते निश्चत काहीसं कमी पडलं आहे. मात्र, गेल्या 10 वर्षांपैकी 2015 ते 2020 दरम्यान खरेदी झालेल्या सोन्यानं जवळपास दुप्पट रिटर्न मिळवून दिले आहेत, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. तर दुसरीकडं, गेल्या वर्षभराचा विचार केल्यास, सोन्याचे भाव स्थिर राहिले असून त्यातून तुलनात्मकरित्या कमी रिटर्न मिळाले आहेत.

    गेल्या दहा वर्षांत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये अनेक चढ-उतार झाले. 2011-26 हजार 350 रुपये, 2012 - 31 हजार 25 रुपये, 2013 - 29 हजार 650 रुपये, 2014 - 28 हजार रुपये, 2015- 26 हजार 400 रुपये, 2016 - 28 हजार 700 रुपये, 2017-26 हजार 600 रुपये, 2018- 31 हजार 400 रुपये, 2019 - 35 हजार 300 रुपये 2020 - 48 हजार 800 रुपये, 2021- 48 हजार 850 रुपये, याप्रमाणे गेल्या दशकभरात सोन्याचे दर होते. गुड रिटर्न्स वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार हे सोन्याचे दर आहेत.

    हे वाचा-स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी चेअरमनना अटक, तुरुंगातच जाणार दिवाळी?

    ऑक्टोबर 2011 पासून, बीएसई सेन्सेक्स सुमारे 13 टक्क्यांनी वाढला आहे. तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, कोविड महामारीनंतर गेल्या वर्षभरात झालेल्या जागतिक आर्थिक सुधारणांमध्ये सोन्याच्या किमतीत किंचित सुधारणा झाली आहे. आर्थिक सल्लागार गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याला जास्त महत्त्व न देण्याचा सल्ला देत नाहीत. केवळ महागाई आणि बाजारातील अस्थिरतेला एक आधार म्हणून सोन्याचा गुंतवणुकीमध्ये समावेश करण्याचा सल्ला देतात. मागील अनुभवांवरून असं दिसून येतं की, जेव्हा-जेव्हा अर्थव्यवस्थेत घसरण होते किंवा बाजार कोसळतात तेव्हा सोन्याचा भाव वाढतो. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे सोन्याची गुंतवणूक असेल तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो.

    जर तुम्ही मागील काही वर्षांत सोन्यावर मिळालेल्या रिटर्न्सचा अभ्यास केला तर, तुमच फाइनान्शियल टारगेट पूर्ण होईल असे रिटर्न त्यातून मिळाले नसल्याचं लक्षात येईल. यावर्षी तर सोन्यानं बचत खात्यापेक्षाही कमी रिटर्न दिले आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

    जर तुम्ही दरवर्षी सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करत असाल तर, तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये 10 टक्क्यांपर्यंत सोनं ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. गुंतवणुकीमध्ये विविधता (Diversification) आणण्यासाठी, प्रत्यक्ष सोन्याऐवजी गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) आणि गोल्ड बॉण्ड्ससारख्या पर्यायी उत्पादनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणूकदारांनी दागिन्यांच्या स्वरूपात सोनं खरेदी करणं टाळावं आणि गुंतवणुकीच्या उद्देशानं डिजिटल सोन्यात गुंतवणूक करावी.

    First published:
    top videos

      Tags: Gold, Investment