• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: पेट्रोलच्या किंमतींनी बिघडवलं सामान्यांचं बजेट, आजही वधारले भाव

Petrol Price Today: पेट्रोलच्या किंमतींनी बिघडवलं सामान्यांचं बजेट, आजही वधारले भाव

आज मुंबईत पेट्रोलचे दर 115.85 रुपये प्रति लीटर आहेत, तर डिझेल 106.62 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Rate in Mumbai) दर शंभरीपार आहेत.

  • Share this:
    मुंबई, 02 नोव्हेंबर: पेट्रोल-डिझेलच्या दरांचा (Petrol-Diesel Price) भडका सुरूच आहे. ज्यामुळे सामान्यांचं बजेट दिवसेंदिवस कोलमडत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर होत आहे. आज मंगळवारी महिन्याच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ (Petrol price hike) झाली असून आज डिझेलचे दर स्थिर आहेत. IOCL ने जारी केलेल्या लेटेस्ट दरांनुसार आज पेट्रोल 35 पैशांनी महागले आहे. आज मुंबईत पेट्रोलचे दर 115.85 रुपये प्रति लीटर आहेत, तर डिझेल 106.62 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Rate in Mumbai) दर शंभरीपार आहेत. त्यामुळे जनतेच्या खिशाला चाप बसत आहे. काय आहेत चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे भाव? (Petrol Diesel Price on 2 November 2021) >> दिल्ली पेट्रोल 110.04 रुपये आणि डिझेल 98.42 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 115.85 रुपये आणि डिझेल 106.62 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 106.66 रुपये आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 110.49 रुपये आणि डिझेल 101.56 रुपये प्रति लीटर हे वाचा-स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी चेअरमनना अटक, तुरुंगातच जाणार दिवाळी? ऑक्टोबर महिन्यात 7.45 रुपयांनी महागलं पेट्रोल गेल्या जवळपास महिन्यापासून इंधन दर सतत वाढता आहे. ऑक्टोबर महिन्यात 25 हून अधिक वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. दररोज 30 आणि 35 पैसे दराने वाढ होऊन ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 7.45 रुपये महागलं आहे. तर डिझेल 7.90 रुपयांनी वाढलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price in Global Market) वाढत्या किमतींमुळे देशातील इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या कच्चे तेल आणखी महाग होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. हे वाचा-चुकीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर केलेत? असे परत मिळतील पैसे कसे तपासाल पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: