मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Digital Rupee चा तुमच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम? वाचा फायदे आणि तोटे

Digital Rupee चा तुमच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम? वाचा फायदे आणि तोटे

डिजिटल रुपी

डिजिटल रुपी

बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन पेमेंट केलं जातं. आता RBI ने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : पर्स-पाकिट किंवा खिशात पैसे ठेवणं आता ही सवय जुनी झाली. काळानुसार गोष्टी पुढे सरकरल्या आणि डिजिटल पेमेंटचा जमाना आला. आजही पैसे आहेत मात्र त्याचा वापर कमी आहे. बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन पेमेंट केलं जातं. आता RBI ने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. RBI 1 डिसेंबरपासून डिजिटल रुपया लाँच करत आहे. हा पायलट प्रोजेक्ट असणार आहे. त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होणार आणि त्याचे फायदे तोटे नेमके काय आहेत जाणून घेऊया.

किरकोळ व्यवहारासाठी फायदेशीर

यापूर्वी 1 नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती बँकेने घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल रुपया बाजारात आणला आणि आता रिटेल वापरासाठी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) लाँच करत आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, आरबीआयने म्हटलं आहे की, रिटेल डिजिटल रुपयाच्या पायलट प्रोजेक्टदरम्यान, त्याच्या वितरण आणि वापराच्या संपूर्ण प्रक्रियेची चाचणी घेतली जाईल. सुरुवातीला निवडक ठिकाणी तो वापरण्याची परवानगी दिली जाणार आहे.

RBI ने आणलेल्या डिजिटल करन्सीचा तुम्हाला काय होणार फायदा?

E- Rupee कसा वापरायचा?

आरबीआयकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. डिजिटल रुपी हे पेमेंटचे माध्यम असेल, जे सर्व नागरिक, व्यवसाय, सरकार आणि इतरांसाठी लीगल टेंडर असणार आहे. त्याचं मूल्य सध्याच्या करन्सीसारखंच असणार आहे. देशात आरबीआयचे डिजिटल चलन (ई-रुपी) लागू झाल्यानंतर रोख रक्कम ठेवण्याची गरज हळूहळू कमी होईल.

करन्सी नोटांना डिजिटल स्वरुप

ई-रुपी डिजिटल टोकनप्रमाणे काम करेल. दुस-या शब्दांत सांगायचं झालं तर आरबीआयने जारी केलेल्या चलन नोटेचा डिजिटल फॉर्म म्हणजे सीबीडीसी. याचा उपयोग चलनाप्रमाणेच व्यवहारांसाठीही करता येतो. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ई-रुपयाचे वितरण बँकांमार्फत होईल. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी किंवा व्यक्ती-ते-व्यापारी व्यवहार डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून करता येणार आहेत. मोबाइल वॉलेट डिजिटल पद्धतीने व्यवहार करू शकणार आहेत. क्यूआर कोड स्कॅन करूनही तुम्ही पैसे भरू शकता.

हातात पैसे ठेवायची गरज नाही! RBI कडून Digital Rupee ची सुरुवात

E-Rupee चे फायदे

डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी फायदेशीर

लोकांना नोटा घेऊन फिरण्याची गरज नाही

मोबाईल वॉलेटसारखी याची पेमेंट सुविधा मिळणार आहे

डिजिटल रुपयाला बँक मनी किंवा कॅशमध्ये कन्वर्ट करता येणार

ई रुपया इंटरनेटशिवाय देखील काम करणार

ई-रूपीचे मूल्यही सध्याच्या चलनाएवढेच असेल.

Digital Currency च्या दिशेन RBI ची वाटचाल, तुम्हाला घेता येणार की नाही वाचा सविस्तर

E Rupee चे तोटे कोणते असू शकतात

यामुळे पैशांच्या देवाण- घेवाणीतील प्रायव्हसी संपुष्टात येईल

रोखीचे किंवा मोबाईल पेमेंटचे व्यवहार गुप्त राहतात मात्र तसं होणार नाही

डिजिटल ट्रान्झॅक्शनवर सरकारची नजर राहणार आहे

ई रुपयावर कोणतंही व्याज मिळणार नाही

व्याज दिलं तर लोक सेव्हिंग अकाउंटमधून पैसे काढून डिजिटल रुपयाकडे वळतील त्यामुळे अस्थिरता निर्माण होऊ शकते

First published:

Tags: Digital currency, Rbi, Rbi latest news