• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • धनत्रयोदशीला काय आहे सोनेखरेदीचा मुहूर्त ते यादिवशी का करतात धनाची पूजा? वाचा एका क्लिकवर

धनत्रयोदशीला काय आहे सोनेखरेदीचा मुहूर्त ते यादिवशी का करतात धनाची पूजा? वाचा एका क्लिकवर

संपूर्ण भारतात 13 नोव्हेंबर 2020 रोजी शुक्रवारी धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2020) साजरी करण्यात येणार आहे. तुम्ही देखील योग्य मुहूर्तावर सोनेखरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या त्याबाबत संपूर्ण माहिती

 • Share this:
  ममुंबई, 12 नोव्हेंबर: संपूर्ण भारतात 13 नोव्हेंबर 2020 रोजी शुक्रवारी धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2020) साजरी करण्यात येणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. सोन्याच्या वस्तू, उपकरणं, दागिने खरेदीसाठी हा शुभमुहूर्त मानला जातो. देवांचा खजिनदार कुबेराचीही पूजा या पवित्र दिवशी केली जाते. धनत्रयोदशी हिंदू धर्मातील सोने खरेदीचा पवित्र दिवस असल्याने बहुतेक जण या शुभमुहूर्तावर सोनं आणि दागिन्यांची खरेदी करतात. सणासुदीचा काळ असल्याने अनेक दुकानांत वेगवेगळे सेल देखील सुरू आहेत. सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदीही केली जाते. पण अनेकांना हे माहीत नसतं की धनत्रयोदशीच्याच दिवशी सोनं खरेदी का करतात? या पवित्र दिवशी हा मौल्यवान धातू खरेदी करण्यामागा एक लोककथा आहे. लोककथा काय सांगते? शेकडो वर्षांपूर्वी  हिम नावाचा राजा होता. लग्नाच्या चौथ्या दिवशी त्याच्या मुलाचा मृत्यू होईल अशी भविष्यवाणी एका ज्योतिषाने केली होती. पण हिम राजाच्या सुनेला ही भविष्यवाणी मान्य नव्हती. त्यामुळे तिने पतीचा जीव वाचवण्यासाठी घराच्या दारात भरपूर दिवे लावले. सोन्याच्या दागिन्यांच्या आणि चांदीच्या नाण्यांच्या राशी रचून ठेवल्या. (हे वाचा-आनंदाची बातमी! धनत्रयोदशीआधी स्वस्त झाले सोने, 50 हजारांपेक्षाही कमी होणार दर) मृत्युची देवता यमराजांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी हिमराजाच्या सुनेने असी क्लुप्ती केली. सोनं, चांदी आणि दिव्यांतून येणाऱ्या प्रचंड प्रकाशामुळे यमराजाचे डोळे दिपले आणि त्याने राजाच्या मुलाचे प्राण घेतले नाहीत. हे घडलं तो दिवस होता धनत्रयोदशीचा. त्यामुळेच लोक धनत्रयोदशीला सोनं आणि चांदी विकत घेतात जेणेकरून नकारात्मक उर्जा आणि वाईट वृत्ती आणि विचार घरापासून दूर राहतात आणि घरात समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. धनत्रयोदशी 2020 ला सोनेखरेदीसाठी शुभ मुहूर्त धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे त्यांनी सकाळी 6 वाजून 42 मिनिटांपासून ते संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांपर्यंत ते खरेदी करावं. हा काळ हिंदू पंचांगानुसार सोनेखरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे. कोरोना महामारीमुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. जमल्यास ऑनलाइन सोनं खरेदी करावं. (हे वाचा-PM Kisan: तुमच्या खात्यामध्ये 18 दिवसानंतर येणार 2000 रुपये! त्याआधी पूर्ण काम) जर दुकानदार दिवाळीनिमित्त मोठ्ठी सूट देत असतील तर तुम्ही कोविड-19 च्या सर्व गाइडलाइन्स पाळून सुरक्षितपणे जाऊन दुकानातून सोनं खरेदी करू शकता. धनत्रयोदशी 2020 च्या पूजेचा मुहूर्त हिंदू पंचांगानुसार 13 नोव्हेंबर 20 शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजून 28 मिनिटांपासून 5 वाजून 59 मिनिटांपर्यत धनत्रयोदशीची पूजा करण्याचा उत्तम मुहूर्त आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: