Home /News /money /

आनंदाची बातमी! धनत्रयोदशीआधी स्वस्त झाले सोने, 50 हजारांपेक्षाही कमी होणार दर

आनंदाची बातमी! धनत्रयोदशीआधी स्वस्त झाले सोने, 50 हजारांपेक्षाही कमी होणार दर

Gold Price: अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत सातत्याने कमी होत आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत.

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस लशीसंदर्भात (Coronavirus Vaccine) सकारात्मक बातम्या समोर येत असल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक सोन्याची मागणी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरमध्ये मजबुती आली आहे, त्यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव वाढत आहे. कॉमेक्सवर सोन्याचे दर 1 टक्क्यांपेक्षा जास्त दराने कमी होऊन 1860 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारात तेजी आली आहे आणि डॉलरमध्ये देखील मजबुती आली आहे, याचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. येणाऱ्या काळात सोन्याचे दर आणखी वेगाने कमी होऊ शकतात. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त कमी होऊ शकतात. धनत्रयोदशीला आणखी स्वस्त होणार सोने तज्ज्ञांच्या मते विदेशी बाजारात घसरण होण्याचे संकेत आहेत, त्याचा परिणाम भारतीय बाजारातील सोन्याच्या किंमतीवर होणार आहे. दिल्लीतील सराफा बाजारात केवळ 3 रुपयांनी सोन्याचे दर वाढले होते. सोन्याच्या तुलनेत चांदीचे दर अधिक प्रमाणात वाढले आहेत. यानंतर सोन्याचे दर 50,114 रुपये प्रति तोळा झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात चांदी 451 रुपये प्रति किलोने वाढली आहे. यानंतर चांदी 60,023 रुपये प्रति किलो झाली होती. Diwali 2020 : धनत्रयोदशीआधी या 5 गोष्टी विकत घ्या, होईल तुमची भरभराट निर्मल बंगच्या कुणाल शाह यांच्या मते, यावर्षी एक हजार टन पर्यंत सोन्याची खरेदी झाली आहे. कोरोना लशीसंदर्भात बातमी आल्याने मोठ्या संख्येने लोकं प्रॉफिट बुकिंग करत आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये मोठी घसरण झाली आहे. 'हे सरपंच शंभर नंबरी सोनं आहे, 10 गावात सापडणार नाही!'गावकऱ्यांची दिवाळी गोड अजून किती कमी होणार किंमत? तज्ज्ञांच्या मते धनत्रयोदशीच्या आधी सोन्याचे दर 50 हजार रुपये प्रति तोळा दरापेक्षा कमी होतील. एलकेपी सिक्योरिटीजचे जतिन त्रिवेदी यांच्या मते गेल्या काही महिन्यांपासून अशी चर्चा सुरू आहे की, कोरोनाची लस आल्यास प्रॉफिट बुकिंग होईल. मोठ्या संख्येने लोकांनी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात पैसे गुंतवले आहेत. अशावेळी लशीसंदर्भात बातमी आल्यानंतर प्रॉफिट बुकिंग झाले आहे. मात्र अजूनही सोन्याचे दर 49500 या किंमतीवर मजबुत आहेत. जोपर्यंत या स्तरावरून किंमती घटत नाहीत तोवर मोठी घसरण होणार नाही.
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today, Money, धनत्रयोदशी 2020

    पुढील बातम्या