नवी दिल्ली, 29 जुलै: तुमच्याकडे डिमॅट (Demat) आणि ट्रेडिंग (Trading) अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. डिमॅट अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट असणाऱ्यांना डिपॉझिटरीकडून (Depositories) 31 जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर तुम्ही 31 जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स अपडेटेड नसतील तर तुमचं डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट डिअॅक्टिव्हेट होऊ शकतं.
नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेज (CDSL) ने यावर्षी 7 आणि 5 एप्रिल रोजी सर्क्युलर जारी केले होते. या सर्क्युलरमधील तपशीलानुसार 31 जुलैपूर्वी केवायसी डिटेल अपडेट करण्याबाबत सांगण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने सहा बाबींचा समावेश आहे-
1. नाव
2. पत्ता
3. पॅन
4. मोबाइल नंबर
5. ईमेल आयडी
6. इन्कम रेंज
हे वाचा-पुन्हा 47 हजारांच्या जवळपास पोहोचलं सोनं, चांदीही 1200 रुपयांनी महागली
दरम्यान 1 जून 2021 पासून उघडण्यात आलेल्या नव्या अकाउंट्ससाठी वरील सर्व केवायसी माहिती अनिवार्य करण्यात आली आहे. सध्याच्या सर्व अकाउंट्ससाठी मार्केट रेग्यूलेटर सेबीद्वारे डिपॉझिटरीजना ही माहिती व्हेरिफाय करण्यास सांगण्यात आली आहे.
हे वाचा-ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे, या सेवांसाठी द्यावं लागणार अधिक शुल्क
शेअर बाजारात वाढतेय किरकोळ गुंतवणुकदारांची भागीदारी
सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी म्हणाले होते की, देशांतर्गत सिक्युरिटीज मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग झपाट्याने वाढला आहे. एप्रिल-जून दरम्यान दरमहा 24.5 लाख डिमॅट खाती उघडली गेली आहेत. ते म्हणाले होते की देशाच्या सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची आवड वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सध्याचा कमी व्याज दर आणि पुरेशी लिक्विडिटी उपलब्धता आहे. त्यागींनी असा इशारा दिला की, लिक्विडिटी कमी झाल्यास किंवा व्याजदर वाढल्यास त्याचा परिणाम बाजारावर होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Share market