जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Work From Home: कोरोनानंतरही मोठ्या संख्येने कर्मचारी करणार घरूनच काम- रिपोर्ट

Work From Home: कोरोनानंतरही मोठ्या संख्येने कर्मचारी करणार घरूनच काम- रिपोर्ट

Work From Home: कोरोनानंतरही मोठ्या संख्येने कर्मचारी करणार घरूनच काम- रिपोर्ट

Deloitte’s 2021 Global Resilience Report नुसार कोरोनाव्हायर पँडेमिकनंतर कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल पाहायला मिळेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 जानेवारी: देशातील टॉप एक्झिक्यूटिव्हच्या (CXOs) मते कोरोना पँडेमिकनंतरही त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी मोठ्या संख्येने कर्मचारी ऑफिसपासून दूर (Remote Working) काम करतील. अर्थात पँडेमिक नंतरही हे कर्मचारी घरातून काम (Work From Home) किंवा ऑफिसव्यतिरिक्त त्यांच्या सोयीच्या ठिकाणावरून काम करतील. बुधवारी डेलॉयट (Deloitte) च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, कंपन्यांनी याआधीच रिमोट वर्किंग किंवा फ्लेक्झिबल कामाच्या तासांसाठी त्यांच्या तत्रज्ञानांमध्ये विशेष बदल केले आहेत. डेलॉयटने असे म्हटले आहे की, ‘भारतातील वरिष्ठ अधिराऱ्यांचे असे म्हणणे आहे की, पँडेमिक आणि लॉकडाऊन पूर्णपणे संपल्यानंतरही त्यांचे कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी ऑफिसपासून दूरूनच काम करतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर असे मानणााऱ्यांच्या तुलनेत भारतीय एक्झिक्यूटिव्हची संख्या जास्त आहे.’ (हे वाचा- घरबसल्या अशाप्रकारे करा तुमचं PAN Card व्हेरिफाय, 2 मिनिटांत होईल काम ) कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल कर्मचारियों के कामकाज के तरीके आया है बदलाव डेलॉयटच्या ग्लोबल रिजिल्यंस रिपोर्ट-2021 (Deloitte’s 2021 Global Resilience Report) मध्ये असे म्हटले आहे की, 2020 मध्ये कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झाले आहेत आणि ते टिकाऊ आहेत. या सर्व्हेमध्ये सामील झालेल्या 70 टक्के भारतीय एक्झिक्यूटिव्ह अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे, आता झालेला बदल किंवा विकास हा त्यांच्यासाठी दुर्मीळ नाही. त्यांचा अशा विश्वास आहे की, भविष्यात कधीनाकधी तरी सातत्याने असे बदल पाहायला मिळतील. वैश्विक स्तरावर असे मानणाऱ्यांची संख्या 62 टक्के आहे. (हे वाचा- पीएमसी बँक घोटाळा: Yes Bank चे माजी एमडी राणा कपूर यांना अटक, ED ची कारवाई ) रचनात्मक विचार करण्यास भाग पाडले डेलॉइट टच टोहमात्सु इंडिया एलएलपीचे भागीदार जयदीप दत्ता म्हणाले की, 2020 या वर्षात भारत आणि जगातील इतर संघटनांना बदलत्या वातावरणाच्या दरम्यान रचनात्मक विचार करायला भाग पाडले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात