नवी दिल्ली, 28 जानेवारी: अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) ने बुधवारी येस बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ राणा कपूर (Rana Kapoor) यांना एका नव्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. हे प्रकरण महाराष्ट्रातील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक (PMC Bank) घोटाळाप्रकरणाशी निगडीत आहे. बुधवारी विशेष पीएमएलए कोर्टाने कपूरला 30 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली. पीएमसी घोटाळा, रिअल इस्टेट डेव्हलपर एचडीआयएलला येस बँकेचं कर्ज, अंधेरीतील नवीन बांधकाम केलेल्या इमारतीचं रिनोव्हेशन इ. याबाबत ईडीला कपूर यांची चौकशी करायची आहे. मिळालेल्या माहितीनुसार वसई-विरार आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या विवा ग्रुपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असणाऱ्या चौकशीमध्ये राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी ताब्यात घेतले. विवा ग्रुपमधील काही कार्यालयांवर ईडीने गेल्याच आठवड्यात छापेमारी केली होती (हे वाचा- Ration Card मध्ये अशाप्रकारे अपडेट करा मोबाईल नंबर आणि पत्ता; घरबसल्या होईल काम ) गेल्या वर्षी मार्चपासून न्यायालयीन कोठडीत राणा कपूर 63 वर्षीय राणा कपूर यांना ईडीने गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली होती. त्यानंतर कपूर न्यायालयीन कोठडीत आहेत. कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात डीएचएफएलशी संबंधित कंपनीकडून 600 कोटी रुपये घेतल्याबद्दल केंद्रीय एजन्सी तपास करीत आहे. आता त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने फेटाळही होती याचिका अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राणा कपूरची जामीन याचिका फेटाळली होती. ते मुंबईच्या तळोजा तुरुंगात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने कपूर यांची जामीन याचिका फेटाळण्यापूर्वी मुंबईतील एका स्पेशल कोर्टाने देखील त्यांना जामीन नाकारला होता.