मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger Stock: 15 रुपयांचा स्टॉक 3000 रुपयांवर, गुंतवणूकदारांना मालामाल करणारा 'हा' शेअर तुम्हाला माहित आहे का?

Multibagger Stock: 15 रुपयांचा स्टॉक 3000 रुपयांवर, गुंतवणूकदारांना मालामाल करणारा 'हा' शेअर तुम्हाला माहित आहे का?

Multibagger Share: दीपक नायट्रेट शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. या कंपनीच्या स्टॉकने अल्पावधीतच लोकांना अनेक पटींनी परतावा दिला आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 9 ऑगस्ट : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत भरपूर नफा मिळवून दिला आहे. मात्र यापैकी काही स्टॉक असे देखील आहेत ज्यांनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांच्या कोट्याधीश बनवलं आहे. असे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉकच्या श्रेणीत येतात. यातील एक शेअर केमिकल क्षेत्राशी संबंधित कंपनीचा आहे. या कंपनीच्या स्टॉकने 10 वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ केली. 12 वर्षांमध्ये या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 11,177.37 टक्के परतावा दिला आहे. सध्या हा शेअर 2,008 रुपयांच्या वरच्या किमतीवर व्यवहार करत आहे. दीपक नायट्रेट शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. या कंपनीच्या स्टॉकने अल्पावधीतच लोकांना अनेक पटींनी परतावा दिला आहे. एकेकाळी दीपक नायट्रेटचा शेअर 15 रुपयांना मिळत होता. मात्र, त्यानंतर या शेअरमध्ये एवढी तेजी आली की, शेअरने तीन हजार रुपयांचा आकडाही पार केला. सरकारकडून विवाहित जोडप्यांना मिळतात 72000 रुपये, तुम्हीही घेऊ शकता लाभ 10 वर्षांतील शेअरची कामगिरी NSE वर 10 फेब्रुवारी 2012 रोजी दीपक नायट्रेट शेअरची किंमत 15.01 होती. यानंतर शेअरने तेजी पकडली. ऑक्टोबर 2021 मध्ये, या स्टॉकने आतापर्यंतचा स्वतःचा उच्चांक गाठला आणि शेअरने 3000 रुपयांची पातळी देखील पार केली. NSE वर दीपक नायट्रेटचा सर्वकालीन उच्चांक आणि 52 आठवड्यांचा उच्चांक 3020 रुपये आहे. मात्र, सध्या दीपक नायट्रेटच्या शेअरमध्ये घसरण झाली असून शेअर दोन हजार रुपयांच्या जवळ व्यवहार करत आहे. त्याचा 52 आठवड्यांचा निच्चांक 1,681.15 रुपये आहे. होम लोन लवकर संपवायचं असेल तर 'या' गोष्टी फॉलो करा, पैशांची बचतही होईल गुंतवणूकदारांना नफाच नफा जर कोणी दीपक नायट्रेटचे शेअर 10 वर्षांपूर्वी 15 रुपये किमतीला एक हजार शेअर्स खरेदी केले असते, तर गुंतवणूकदाराला 15 हजार रुपये गुंतवावे लागले असते. दुसरीकडे हे एक हजार शेअर्स 3000 रुपयांना विकले गेले असते तर गुंतवणूकदाराला 30 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. आता 2,000 रुपयांना विकले ते शेअर गेले असते तर त्यांना 20 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.
First published:

Tags: Investment, Money, Share market

पुढील बातम्या