होम लोन घेऊन अनेकजण आपल्या स्वप्नातील घर खरेदी करतात. मात्र रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने सर्वच बँका आपल्या सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे होम लोनचं बोजाही वाढत आहे. त्यामुळे वाढलेल्या व्याजदरामुळे तुम्हीही चिंतेत असाल तर हे ओझे कमी कसं करता येईल याबाबत माहिती घेऊयात.
प्री-पेमेंट- होम लोनमध्ये तुम्ही प्रीपेमेंटचा पर्याय निवडल्यास तुमचे गृहकर्ज लवकर संपवू शकता. जेव्हा तुमच्याकडे काही रुपयांची बचत होते, तेव्हा तुम्ही त्याचे प्री-पे बँकेला करा. यामुळे तुमची मुद्दल रक्कम कमी होईल आणि याद्वारे तुम्ही कर्जाचा कालावधी किंवा ईएमआय कमी करू शकता. आरबीआयच्या नियमांनुसार, फ्लोटिंग रेट होम लोन घेणार्या बँका किंवा एनबीएफसी कोणत्याही वैयक्तिक गृहकर्ज कर्जदाराकडून प्रीपेमेंटसाठी कोणताही दंड आकारू शकत नाहीत.