मुंबई, 9 ऑगस्ट: तुमचं लग्न झालं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण विवाहित जोडप्यांना केंद्र सरकारकडून 72,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. मात्र, यासाठी सर्व विवाहित जोडप्यांना दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत ही योजना सुरू केली होती. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते किंवा जन धन खाते आणि आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये नोंदणीची प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होते. या योजनेनुसार, जर एखाद्या व्यक्तीचे वय 30 वर्षे असेल तर त्याला या योजनेत दरमहा 100 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच वर्षभरात 1200 रुपये जमा करावे लागतील. अशाप्रकारे वयाच्या 60 वर्षापर्यंत तुमची एकूण 36 हजार रुपये सरकारकडे जमा होतील. या आधारावर, तुम्हाला दरमहा 3000 हजार रुपये पेन्शन मिळेल आणि मृत्यूनंतर जोडीदाराला या 1500 रुपयांच्या पेन्शनपैकी निम्मी रक्कम दरमहा मिळण्याची हमी आहे. जर पती-पत्नी दोघेही यात सहभागी झाले तर दोघांनाही अशा प्रकारे दरमहा एकूण 6000 रुपये पेन्शन मिळेल. याचा अर्थ तुम्ही तुमच्या पत्नीसह वार्षिक 72000 रुपये मिळवण्यास पात्र असाल.
होम लोन लवकर संपवायचं असेल तर 'या' गोष्टी फॉलो करा, पैशांची बचतही होईल
कुणाला मिळेल लाभ?
केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करायची असेल तुमचे वय 18 ते 40 वर्षांच्या आत असावे. निवृत्तीनंतर सर्व गुंतवणूकदारांना पेन्शनची रक्कम देणे हा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा उद्देश आहे.
कुणाला या योजनेचा फायदा मिळणार नाही?
वार्षिक उत्पन्न 1.5 कोटींपेक्षा कमी असावे. जर तुम्ही EPF/NPS/ESIC चे सदस्य असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. PM-SYM च्या लाभार्थ्यांना देखील हा लाभ मिळणार नाही. तुम्ही आयकर जमा करत असल्यास तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकत नाही.
Aadhar Cardमध्ये किती वेळा बदल करता येतात? नाव, पत्ता, लिंग बदलाबाबत नियम समजून घ्या
योजनेअंतर्गत गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार गुंतवणूक करू शकतात. जेणेकरून अधिकाधिक लोक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतील. राष्ट्रीय पेन्शन योजनेत दोन प्रकारची खाती आहेत ज्यांना टियर वन आणि टियर टू म्हणतात. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतरही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.