मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ITR Filing: फॉर्म 16 शिवायही भरू शकता आयकर रिटर्न, जाणून घ्या सविस्तर

ITR Filing: फॉर्म 16 शिवायही भरू शकता आयकर रिटर्न, जाणून घ्या सविस्तर

फॉर्म 16 हा असा महत्त्वाचा दस्तावेज आहे जो व्यक्ती ज्या कंपनीत नोकरी करते त्या कंपनीकडून त्या व्यक्तीला दिला जातो. या फॉर्ममध्ये नोकरदाराला दिलेल्या वार्षिक पगार (Yearly Income) आणि आर्थिक बाबींची माहिती असते.

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर: तुम्ही नोकरदार असाल आणि जर दरवर्षी आयटी रिटर्न (ITR Filing News) भरत असाल तर तुम्हाला फॉर्म 16 बद्दल सांगायची गरज नाही. पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आम्ही सांगतो की फॉर्म 16 हा असा महत्त्वाचा दस्तावेज आहे जो व्यक्ती ज्या कंपनीत नोकरी करते त्या कंपनीकडून त्या व्यक्तीला दिला जातो. या फॉर्ममध्ये नोकरदाराला दिलेल्या वार्षिक पगार (Yearly Income) आणि आर्थिक बाबींची माहिती असते. हा फॉर्म आयटीआर भरताना सबमिट करावा लागतो.

बऱ्याच नोकरदारांना असं वाटतं की फॉर्म 16 शिवाय आयटीआर भरताच येत नाही. पण बरेचदा असं होतं की आयटीआर भरायची मुदत संपत आली (Last Date of filing ITR) तरीही कंपनीने फॉर्म 16 दिलेलाच नाही. जर तुमची कंपनीच बंद होत असेल किंवा तुम्ही औपचारिकता म्हणजे कागदपत्रांचे व्यवहार पूर्ण न करताच नोकरी बदलली असेल तरीही असं होऊ शकतं की तुमच्याकडे फॉर्म 16 नसेल. जर तुमच्याकडे फॉर्म 16 नसेल आणि तरीही तुम्हाला आयटीआर भरायचा असेल तर तुम्ही फॉर्म 16 शिवायही आयटीआर (ITR filing without Form16) भरू शकता.

हे वाचा-या शेअरने दिला 240 टक्क्यांपेक्षा अधिक बंपर रिटर्न! ₹1,091 वर पोहचू शकतो स्टॉक

ज्या पगारदारांकडे फॉर्म 16 नाहीए त्यांनी आपला आयटीआर कसा भरावा?

तुम्हाला पहिल्यांदा पगारातून मिळणारं उत्पन्न (Income from Salary) दाखवावं लागेल. यासाठी तुम्हाला पे स्लिपचा वापर करता येईल. आर्थिक वर्षात तुम्ही जिथंजिथं नोकरी केली आहे तिथल्या पे स्लिप्स (Salary Slips) तुम्ही सांभाळून ठेवल्या असतीलच. त्या पे स्लिपमधून तुम्हाला वर्षाला मिळालेल्या रकमेची माहिती आयटी रिटर्न भरताना देता येईल.

यात तुम्हाला एकूण पगार ज्यात कलम 17 (1) नुसार पगार, 17(2) इतर भत्ते, 17(3) पगाराव्यतिरिक्त भत्ते, कलम 10 नुसार सूट, कलम 16 नुसार कापली जाणारी रक्कम, मनोरंजन भत्ता (फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी) आणि प्रोफेशनल टॅक्सची माहिती द्यावी लागेल.

तुमच्या पे स्लिपमध्ये वर दिलेली माहिती असायला हवी. बरेचदा कंपन्या पे स्लिपमध्ये इतर भत्ते आणि पगाराव्यतिरिक्त भत्ते यांच्या रकमांचा उल्लेख करत नाहीत. त्यामुळे फॉर्म 16 चीच वाट पहायला लागू शकते. पण जर ही माहिती तुमच्या पे स्लिपमध्ये असेल तर तुम्हाला फॉर्म 16 नसतानाही आयटी रिटर्न (Income Tax Return) भरता येईल.

हे वाचा-Gold Price Today: 10 ग्रॅम सोने दरात आज घसरण, पाहा काय आहे लेटेस्ट रेट

सगळी आर्थिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या कंपनीच्या एचआर किंवा फायनान्स विभागाकडे फॉर्म बी1 द्यावा अशी मागणी करू शकता. या अर्जात इतर भत्ते आणि पगाराव्यतिरिक्त भत्ते यांची माहिती असते. जर तुम्हाला कंपनीने हा फॉर्म दिला तर तुम्ही फॉर्म 16 शिवायही आपला आयटी रिटर्न भरू शकता.

First published:

Tags: Income tax