नवी दिल्ली, 29 मे : सध्या बहुतांश लोक क्रेडिट कार्ड वापरतात. पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे आहेत. क्रेडिट कार्ड वापरताना अनेक प्रकारच्या ऑफर, डिस्काउंट आणि रीपेमेंटसाठी विना व्याज 50 दिवस मिळतात. क्रेडिट कार्डच्या मदतीने आपण आपली बिले सहज भरू शकतो आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी पैसे देऊ शकतो. क्रेडिट कार्डचे अनेक फायदे पाहता अनेक लोक एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवतात. क्रेडिट कार्डचे जितके फायदे आहेत तितकेच काही तोटे देखील आहे. अशा वेळी तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असावेत की नाही हे तुम्हाला माहिती असायला हवे. चला तर मग जाणून घेऊया…
क्रेडिट कार्ड कधी घ्यायला हवं?
तुम्हाला तुमचं फायनेंस मॅनेज करण्यासाठी क्रेडिट कार्ड घेण्याची गरज असेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊ शकता. क्रेडिट कार्ड मॅनेज करण्यासाठी तुम्हाला जास्त एफर्ट घ्यायची गरज नसते. तुम्ही त्याचे बिल वेळेवर सहज फेडू शकता. वेळेवर बिल भरून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता. असंही मानलं जातं की, नवीन क्रेडिट कार्ड यूझर्ससाठी, फक्त एक क्रेडिट कार्ड असणे चांगले आहे.
Income Tax डिपार्टमेंटने जारी केले फॉर्म, जाणून तुम्हाला कशाची गरज पडेल?एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवण्याचे फायदे
प्रत्येक कंपनीच्या क्रेडिट कार्डमध्ये वेगवेगळ्या सुविधा मिळतात. तसंच क्रेडिट कार्डचे विविध प्रकारही असतात. उदाहरणार्थ, काही क्रेडिट कार्ड यूझर्सला फक्त प्रवासाशी संबंधित सूट देतात. तर, काही क्रेडिट कार्ड फक्त ऑनलाइन शॉपिंग आणि फ्यूलवर डिस्काउंट देतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या सर्व ऑफर्सचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवू शकता. मात्र त्याचं बिल वेळेवर भरणं आवश्यक असतं. असं न केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.
वर्षभराची FD करायची गरज नाही, 30-40 दिवसांतही होते कमाई; कशी करायची गुंतवणूक?दुसरं क्रेडिट कार्ड कधी घ्यावं?
दुसरं क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुम्हाला तुमचे दैनंदिन खर्च आणि लाइफस्टाइल समजून घेणे आवश्यक आहे. ज्यावर तुम्ही जास्त खर्च करता. मग त्यानुसार तुम्ही ब्रँडेड क्रेडिट कार्ड घ्यायला हवं. उदाहरणार्थ, जर तुम्ही फ्लाइटमध्ये खूप प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एअर माइल्स क्रेडिट कार्ड घेणे अधिक चांगले होईल. दुसरीकडे, जर तुम्ही खूप शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी शॉपिंग क्रेडिट कार्ड घेणं फायद्याचं असतं.