मुंबई, 25 मे : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा नवा सीझन सुरू झाला आहे. आयकर विभागाने लोकांना ITR दाखल करण्यात मदत करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर ITR-1 आणि ITR-4 फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. ITR-1 आणि ITR-4 मध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊया. यासोबतच, आपण इतर प्रकारच्या ITR फॉर्मबद्दल देखील जाणून घेऊ. सर्वप्रथम, आम्ही तुम्हाला सांगतो की आयकर रिटर्नसाठी एकूण 06 प्रकारचे फॉर्म आहेत. तुम्हाला कोणता फॉर्म निवडायचा आहे हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असतं. तुम्ही कोणत्या श्रेणीतील करदाते आहात यावर फॉर्म ठरतो. तुम्ही चुकीचा फॉर्म निवडला असेल, तर आयकर विभाग तुमचे रिटर्न डिफेक्टिव म्हणून घोषित करू शकते. अशा वेळी फॉर्मविषयी सर्व काही नीट समजून घेणे आवश्यक आहे.
ITR-1: भारतीय नागरिक, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाखांपर्यंत आहे, त्यांच्यासाठी हा फॉर्म आहे. हे उत्पन्न सॅलरी, फॅमिली पेन्शन, निवासी मालमत्ता इत्यादींमधून असावे. लॉटरी किंवा रेस कोर्समधून मिळणारे उत्पन्न या श्रेणीत येत नाही. दुसरीकडे, शेतीतून मिळणारे उत्पन्न 5,000 रुपयांपर्यंत असले तरीही ITR-1 हा योग्य प्रकार आहे. तुम्ही एखाद्या कंपनीत संचालक असाल किंवा अनलिस्टेड कंपनीत तुमचे शेअर असल्यास, तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही.
नोकरदार वर्गासाठी आला आयटीआर फॉर्म, नवं की जुनं कोणतं टॅक्स रिजीम बेस्ट?
ITR-2: हा फॉर्म व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त आहे आणि ते कोणत्याही व्यवसायातून नफा मिळवत नाहीत. यामध्ये एकापेक्षा जास्त निवासी मालमत्ता, इन्वेस्टमेंटवर झालेला कॅपिटल गेन किंवा लॉस, 10 लाख रुपयांपेक्षा जास्त डिविडेंड इन्कम आणि 5000 रुपयांपेक्षा जास्त शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल. प्रॉव्हिडेंट फंडातून व्याज म्हणून कमाई होत असेल तरीही हाच फॉर्म भरावा लागतो.
ITR-3: हा फॉर्म व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी आहे जे व्यवसायाच्या नफ्यातून कमावत आहेत. यामध्ये ITR-1 आणि ITR-2 मध्ये दिलेल्या सर्व उत्पन्न श्रेणींची माहिती द्यावी लागेल. जर एखादी व्यक्ती एखाद्या फर्ममध्ये भागीदार असेल तर त्याला वेगळा आयटीआर फॉर्म भरावा लागेल. शेअर्स किंवा मालमत्तेच्या विक्रीतून भांडवली नफा किंवा व्याज किंवा लाभांशातून मिळकत असली तरीही तोच फॉर्म भरावा लागेल.
ITR-4 म्हणजेच सुगम: हा फॉर्म व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंबे आणि LLP व्यतिरिक्त इतर कंपन्यांसाठी आहे. ज्यांचे एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त आहे आणि ते कलम 44AD, 44ADA किंवा 44AE सारख्या स्रोतांमधून कमाई करत आहेत. हा फॉर्म अशा लोकांसाठी लागू नाही जे कोणत्याही कंपनीत संचालक आहेत किंवा इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात किंवा शेतीतून 5000 रुपयांपेक्षा जास्त कमावतात.
FD वर कुठं मिळतंय जास्त व्याज? या बँका देताय जबरदस्त ऑफर
ITR-5: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी हा फॉर्म LLP कंपन्या, एसोसिएशन ऑफ पर्सन्स, बॉडी ऑफ इंडिविजुअल्स, आर्टिफिशियल ज्यूरीडिकल पर्सन, को-ऑपरेटिव सोसाइटी आणि लोकल अथॉरिटीसाठी आहे.
ITR-6: हा फॉर्म अशा कंपन्यांसाठी आहे ज्यांनी कलम 11 अंतर्गत सूटचा दावा केलेला नाही. कलम 11 अन्वये, अशा प्रकारचे उत्पन्न करातून मुक्त आहे, जे कोणत्याही परमार्थ किंवा धर्मादाय कार्यासाठी ट्रस्टकडे ठेवलेल्या मालमत्तेतून मिळवले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax, Income Tax Return