जाहिरात
मराठी बातम्या / मनी / या IT कंपनीची मोठी घोषणा! Corona संकटाशी सामना करण्यासाठी भारतात गुंतवणार 50 कोटी

या IT कंपनीची मोठी घोषणा! Corona संकटाशी सामना करण्यासाठी भारतात गुंतवणार 50 कोटी

या IT कंपनीची मोठी घोषणा! Corona संकटाशी सामना करण्यासाठी भारतात गुंतवणार 50 कोटी

भारतातल्या कोव्हिडच्या (COVID-19) संकटाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन आता अनेक खासगी कंपन्याही मदतीसाठी पुढे येत आहेत. कॅपजेमिनी (Capgemini) या आयटी कंपनीने आरोग्यविषयक पायाभूत सुविधांसाठी 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 04 मे: भारतातल्या कोव्हिडच्या (COVID-19) संकटाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन आता अनेक खासगी कंपन्याही मदतीसाठी पुढे येत आहेत. कॅपजेमिनी (Capgemini) या आयटी कंपनीने आरोग्यविषयक पायाभूत सुविधांसाठी 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय सोमवारी (3rd May 2021) जाहीर केला. त्याशिवाय, भारतातल्या आरोग्यविषयक कार्याला मदत म्हणून कंपनी युनिसेफला (UNICEF) पाच कोटी रुपये दान देणार आहे. त्या निधीतून तीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स (Oxygen Generation Plants) उभारले जाणार असून, उर्वरित निधीतून आरटी-पीसीआर तपासणी यंत्रांची (RT-PCR Testing Machines) संख्या वाढवली जाणार आहे. अतिदक्षता विभागातल्या सुविधा (ICU), ऑक्सिजन उत्पादन संयंत्र आदींसह आरोग्यविषयक दीर्घकालीन पायाभूत सुविधांच्या (Long Term Infrastructure) उभारणीसाठी, तसंच मदतकार्यासाठी 50 कोटी रुपयांची गुंतवणूक वापरली जाणार असल्याचं कॅपजेमिनी कंपनीने स्पष्ट केलं आहे. या अनुषंगाने कंपनीची कार्यालयं ज्या ज्या राज्यांत आहेत, त्या राज्यांच्या सरकारांशी कॅपजेमिनीतर्फे चर्चा सुरू आहे. हे वाचा- SBI खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; घरबसल्या अपडेट करा KYC, जाणून घ्या प्रोसेस कॅपजेमिनीतर्फे आरोग्य क्षेत्रात करण्यात येणारी ही गुंतवणूक त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (Corporate Social Responsibility) अर्थात सीएसआर निधीपेक्षा (CSR Fund) वेगळी असेल, असंही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. देशात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासतो आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीची ही गुंतवणूक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अलीकडेच ‘कॅपजेमिनी इंडिया’ने (Capgemini India) आयआयटीसह (IIT) एकत्रित काम करण्याची घोषणाही केली होती. शिक्षण क्षेत्र, इंजिनीअरिंग, लो-कार्बन टेक्नॉलॉजी, एअरोस्पेस, ऑटोमोबाइल, मॅन्युफॅक्चरिंग आदी क्षेत्रांत नावीन्यपूर्ण काम याद्वारे केलं जाणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं होतं. हे वाचा- Gold Price: सोन्याच्या किंमती वाढत असताना दागिने विकणं ठरेल फायद्याचं? देशातली बिकट परिस्थिती पाहून अनेक खासगी कंपन्यांनी शक्य त्या मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात टाटा कंपनी आघाडीवर आहे. लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी 24 क्रायोजेनिक कंटेनर्स आयात करण्याचा निर्णय नुकताच टाटा ग्रुपने घेतला. त्यामुळे देशाला सध्या मोठ्या प्रमाणावर जाणवत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा कमी होण्यास हातभार लागणार आहे. कोव्हिड-19च्या संकटकाळात डॉक्टर्स आणि नर्सेसना देशभरात मोफत प्रवासाची सोय देण्याचा निर्णय विस्तारा एअरलाइन्सने जाहीर केला आहे. महिंद्रा ग्रुपनेही अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची मदत पुढे करून देश संकटातून बाहेर येण्यासाठी हातभार लावला आहे. आपल्या कंपनीची रिसॉर्टस् कोविड सेंटर म्हणून वापरण्यास देणं, आपल्या कंपन्यांमध्ये व्हेंटिलेटर्सची निर्मिती करणं, अर्थसाह्य करणं वगैरे उपक्रम महिंद्रा कंपनीने राबवले. आणखीही अनेक कंपन्यांनी आपापल्या परीने अशी मदत देऊ केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात